Healthy Relationship Tips : आपल्याला नेहमीच मोठ्यांनी सांगितले असेल, आयुष्य एकट्याने कधीच घालवता येत नाही. ही गोष्ट कुठे ना कुठे तरी खरी आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पार्टनरची गरज असते. जेणेकरुन तो तुम्हाला भावनात्मक समजून घेईल, तुमची साथ देईल, तुमच्यावर प्रेम करेल. खरंतर एका हेल्दी रिलेशनशिपसाठी फार महत्त्वाचे म्हणजे. तुमच्यात आणि पार्टनरमध्ये एकमेकांसाठी विश्वास आणि सन्मान असणे गरजेचे आहे.
याशिवाय कोणत्याही नात्यात मर्यादा असणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन पार्टनरलाही त्याची पर्सनल स्पेस मिळेल. अशातच हेल्दी रिलेशनशिपसाठी कोणत्या मर्यादा असाव्यात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
फिजिकल मर्यादा
तुम्ही एकमेकांवर प्रेम करता म्हणजे 24 तास पार्टनरसोबत राहणे नव्हे. एकमेकांना फिजिकल स्पेस देणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही एकमेकांच्या पर्सनल स्पेस आणि इच्छांचा सन्मान केला पाहिजे.
भावनात्मक मर्यादा
प्रत्येक व्यक्तीचे बॅकग्राउंड, पालनपोषण आणि अनुभव वेगवेगळे असतात. अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या भावना व्यक्त करण्याची एक वेगळी पद्धत असते. अशातच पार्टनरने एकमेकांच्या भावना, पर्सनल स्पेसचा सन्मान केला पाहिजे. भावनांवरुन एकमेकांसोबत वाद घालणे टाळा.
सेक्शुअल मर्यादा
कोणत्याही हेल्दी रिलेशनशिपमध्ये सेक्शुअल मर्यादा असाव्यात पार्टनरला तुमच्यासोबत सुरक्षित वाटण्यासाठी रिलेशनशिपमध्ये संवाद, संमती आणि सेक्शुअल मर्यादा असणे अत्यंत गरजेचे आहे. (Healthy Relationship Tips)
डिजिटल मर्यादा
आपण सर्वांनी बहुतांशवेळा ऐकले असेल की, लोक शारिरीक रुपात एकत्रित असतात. पण भावनात्मक आणि मानसिक रुपात वेगवेगळे असतात. यामागील कारण म्हणजे डिजिटलाइजेशन. कोणत्याही नात्यात महत्त्वाचे म्हणजे, टेक्नॉलॉजीच्या वापरासंदर्भात काही मर्यादा आखल्या पाहिजेत. याशिवाय पार्टनरच्या डिजिटल स्पेसमध्ये ढवळाढवळ करू नये.
संवादाच्या मर्यादा
हेल्दी रिलेशनशिपसाठी संवाद फार महत्त्वाचा असते. अशातच पार्टनरने एकमेकांसोबत प्रत्येक गोष्टीवर बोलले पाहिजे. संवादाच्या मर्यादा नात्यात आल्यास नाते दीर्घकाळ टिकणार नाही.