Healthy Meal Ideas: आपल्या दैनंदिन जीवनात आहार हा आरोग्याचा पाया आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना स्वतःसाठी पौष्टिक आणि संतुलित जेवण तयार करायला वेळ मिळत नाही, पण हेल्दी थाली बनवणे कठीण नाही. थोडं नियोजन, थोडी कल्पकता आणि घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून आपण चविष्ट आणि पौष्टिक थाली तयार करू शकतो. हेल्दी थाली म्हणजे केवळ डाएट नव्हे, तर शरीराला आवश्यक सर्व घटकांचा योग्य संतुलन असलेला आहार कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, फॅट आणि मायक्रोन्युट्रिएंट्स यांचा समतोल.

Healthy Meal Ideas
रंगीत थाली: आपल्या ताटात जितके जास्त रंग दिसतील, तितका आहार संतुलित असेल. हिरव्या भाज्यांमधून आयरन आणि फायबर मिळते, तर नारंगी किंवा लाल भाज्यांमधून व्हिटॅमिन A आणि C मिळते. उदाहरणार्थ, हिरव्या मटकीची उसळ, गाजर-बेटरूट कोशिंबीर, पालकाची भाजी, आणि बाजरीची भाकरी यांचा समावेश असलेली थाली ही रंगीत आणि हेल्दी असते. यासोबत ताक किंवा छास घेतल्यास पचन सुधारणे शक्य होते. महिलांसाठी ही थाली विशेष उपयुक्त आहे. कारण ती आयरन ने भरपूर आहार देते आणि त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.(Healthy Meal Ideas)

Healthy Meal Ideas
मल्टिग्रेन थाली: आजच्या काळात मल्टिग्रेन म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी, इत्यादी धान्यांचा वापर वाढला आहे. हे धान्य फायबरने समृद्ध असून वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. एका थालीत नाचणीची भाकरी, मिश्र डाळीचं आमटी, कोबी-मटरची भाजी, आणि मूगाची कोशिंबीर याचा आहारात समावेश करा. ही थाली आयरन, कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत ठरते. विशेषत महिलांच्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या थकव्यावेळी ही थाली अत्यंत फायदेशीर ठरू शकते. Healthy Meal Ideas)

Healthy Meal Ideas
डिटॉक्स थाली: या थालीच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते.यासाछी सकाळी लिंबू पाण्याने दिवसाची सुरुवात करा आणि दुपारी भात किंवा भाजी ऐवजी क्विनोआ किंवा ब्राउन राईस खाऊ शकता. त्यासोबत उकडलेल्या भाज्या, हिरव्या सॅलडमध्ये ऑलिव्ह ऑइलचा थोडा स्पर्श, आणि सूप असा हलका आहार घ्या. या आहारामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते, त्वचा उजळते आणि शरीर हलके वाटते. आठवड्यातून एकदा अशा डिटॉक्स थालीचा समावेश केल्यास शरीराला नवी उर्जा मिळू शकते.

Healthy Meal Ideas
घरगुती पारंपरिक हेल्दी थाली: आपल्या आजीच्या स्वयंपाकघरात सगळ्या गोष्टींमध्ये पौष्टिकता दडलेली असते. उकडलेला भात, वरण, भाजलेले पापड, डाळ-भाजी, दही आणि लोणचे हा सोपा पण संतुलित आहार आहे. घरच्याघरी उपलब्ध पदार्थांचा वापर करून तयार होणारी ही थाली आपल्या पचनसंस्थेला आराम देते. याशिवाय रोजच्या आहारात संतुलन राहते. घरी बनवलेले लोणी किंवा तूप यांचा थोडासा वापर केला तर शरीराला आवश्यक ‘गुड फॅट्स’ मिळतात.
================
हे देखील वाचा:
Government Policies : सरकारी धोरणांमधील बदल आणि त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम
Organizing Tips For Home : कपाट, किचन आणि घर व्यवस्थित ठेवण्याच्या ५ ट्रिक्स
Water Therapy म्हणजे काय? ते कसे काम करते याबद्दल घ्या जाणून
=================
हेल्दी थाली तयार करताना लक्षात ठेवा जास्त तेल, साखर आणि मीठ टाळा, भरपूर भाज्या आणि सिजनल फळांचा समावेश करा. जेवण आकर्षक दिसले आणि खाण्याची आनंद वाढतो. घरच्या घरी बनवलेली हेल्दी थाली म्हणजे आरोग्य, चव आणि समाधान यांचा सुंदर मिश्रण आणि आपल्या कुटुंबाचा आरोग्याही उत्तम रहाते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics