Healthy Habits for Life : तुमच्या सकाळच्या सुरुवातीवर संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असते. अशातच दररोजचा दिवस आनंदात, उत्साहात जाण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमचा संपूर्ण दिवस उत्तम जाण्यासाठी सकाळची सुरुवात नेहमीच सकारात्मक विचाराने करावी असा सल्ला बहुतांशजण देतात. खरंतर सकाळी सकारात्मक विचाराने उठल्याने तुम्हाला आनंदी, उत्साही वाटते. याशिवाय कामामुळे होणारी चिडचिड देखील दूर राहते. अशातच संपूर्ण दिवस आनंदात जाण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
सकाळी लवकर उठा
सकाळी लवकर उठण्याच्या सवयीमुळे तुम्ही हेल्दी आयुष्य जगू शकता. याशिवाय सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये फिरल्यास शरिराला व्हिटॅमिन डी मिळते. त्याचसोबत तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांचे आरोग्य देखील उत्तम राहते. यामुळे दररोज सकाळी लवकर उठून 15-20 मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा.
सकारात्मक विचार
सकाळी उठल्यानंतर स्वत: बद्दल सकारात्मक विचार करा. याचा फायदा असा होतो की, तुमचा आत्मविश्वास वाढला जातो. तुम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्यासह तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जातो.
व्यायाम
व्यायाम केल्याने तुम्ही हेल्दी राहता. सकाळी मेडिटेशन, योगाभ्यास किंवा हलकी एक्सरसाइज केल्याने तुमचे मन शांत होते. याशिवाय तुम्हाला एनर्जेटिक वाटते. आनंदी आणि तणावमुक्त आयुष्य जगायचे असल्यास दररोज स्वत: साठी वेळ काढा. (
हेल्दी ब्रेकफास्ट
आपण जे खातो, त्यामुळे शरिराला उर्जा मिळते. यामुळे सकाळच्या नाश्ता पोटभर आणि हेल्दी करावा. नाश्तावेळी तुम्ही प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि कार्बोहाइट्रेड्स सारख्या पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. (Healthy Habits for Life)
हाइड्रेट राहा
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्या. यामुळे तुमचा मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होईल. तुम्ही डिटॉक्स ड्रिंकचे देखील सेवन करू शकता.