Healthy Drinks : उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाण्यासह लोहाची कमतरता निर्माण होणे सर्वसामान्य बाब आहे. यामुळे थकवा, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात. खरंतर, शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास हिमग्लोबीनचा स्तर कमी होऊ लागतो. यामुळे शरीराच्या अवयवयांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. या स्थितीला अॅनिमिया असे देखील म्हटले जाते. आरोग्य तज्ज्ञ यावेळी लोहाच्या सप्लिमेंट्स किंवा लोहयुक्त आहाराचे सेवन करण्याचा सल्ला देतात. याशिवाय फार महत्वाचे म्हणजे, शरीराला लोहासह व्हिटॅमिन सी ची देखील आवश्यकता असते. जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या हेल्दी आणि रिफ्रेशिंग ड्रिंक्स पिऊ शकता याबद्दल पुढे….
बीटाचा ज्यूस
बीटाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे रक्तवाढीसह शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळते. बीटाचा ज्यूस प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होते, मेंदूचे कार्य सुधारले जाते, शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
सत्तू सरबत
सत्तूचे उन्हाळ्यातील सुपरफूड मानले जाते. यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासह लोह, प्रोटीन आणि फायबर अशी पोषण तत्त्वे मिळतात.सत्तूच्या सरबतमध्ये लिंबू आणि मसाल्यांचा वापर केल्याने रिफ्रेश वाटण्यास मदत होईल.

Healthy Drinks
डाळिंबाचा ज्यूस
डाळींबाची चव गोड असण्यासह लोहचा उत्तम स्रोत मानले जाते. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेला ग्लो देखील येतो.
उसाचा रस
उसाचा रस शरीरातील लोहाचा स्तर समतोल राखण्यास मदत करतो. हा रस लहान मुलांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. रिफ्रेशिंग ड्रिंक्समध्ये याचा समावेश करू शकता. (Healthy Drinks)
=======================================================================================================
हेही वाचा :
दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य
आंब्यांच्या पानांचे सेवन केल्यास मिळतील हे 5 फायदे
=======================================================================================================
आवळ्याचा ज्यूस
आवळ्याचा ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होऊ शकते. दररोज एक ग्लास आवळ्याचे ज्यूस प्ययाल्याने शरीरातील हिमग्लोबीनचा स्तर सुधारला जातो.