आजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेच पुरेसा वेळ नाही. सतत काम आणि घर यात अडकलेल्या लोकांना आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावताना दिसत असतात. मात्र अपुऱ्या वेळामुळे लोकांना स्वतःची काळजी घेणे शक्य नसते. अशावेळेस जर आपल्या खाण्यापिण्यात आपण सकस, पौष्टिक, आरोग्यास उत्तम असा आहार घेणे सुरु केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. शरीराला उपयुक्त आहार घेऊन देखील तुम्ही शरीराची निगा ठेऊ शकतात.
आपण जर पाहिले तर सेलिब्रिटी लोकं अनेकदा त्यांचे खान-पान, त्यांचे डाएट आपल्यासोबत शेअर करतात. त्यांच्यासारखा फिटनेस आपला देखील असावा असे सगळ्यांनाच वाटत असते. मात्र आपल्याला त्यासाठी जास्त खर्च देखील परवडणारा नसतो. अशावेळेला घरातीलच रोजच्या वापरातील जिन्नस वापरून आरोग्य कसे मिळवता येईल याचा विचार सगळे करतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा मात्र रामबाण उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही केला किंवा या पदार्थाला तुम्ही तुमच्या जेवणात स्थान दिले तर नक्कीच तुम्हाला आरोग्याला फायदा होऊ शकतो.
आपण अनेकदा मोड आलेले कडधान्य खाल्ल्यास खूपच फायदा होतो असे ऐकले असेल. त्यामुळे बरेच लोकं मोड आलेले धान्य खातात. मात्र यासोबतच तुम्ही तुमच्या आहारामध्ये मोड आलेले मेथी दाणे देखील घेण्यास सुरुवात केली पाहिजे. मोड आलेले मेथी दाणे खाल्ल्याने शरीरास अतिशय लाभ होतात. मेथी शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. खाण्यात स्वादिष्टपणा आणण्यापासून ते अगदी पचनशक्ती चांगली राहण्यापर्यंत मेथी दाण्यांचा वापर करून घेता येतो. चला जाणून घेऊया याच मोड आलेल्या मेथी दाण्याचे फायदे.
मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी च्या पोषक तत्वाने मेथी भरलेली आहे. पचनशक्ती सुधारण्यासोबतच शरीरातील अशक्तपणा देखील यामुळे कमी होतो पोटातील चरबी कमी होऊन त्वरीत वजन कमी होते. मेथीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असतात, जे शरीराला हेल्दी ठेवत अनेक आजारांना दूर करतात.
१) नॅच्युरल ब्लड क्लींजर
अंकुरलेली मेथी हे नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करण्याचा उत्तम मार्ग आहे. मेथी रक्त शुद्ध करते आणि त्यात ऑक्सिजनचा प्रवाह देखील वाढवते. शिवाय सर्व विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यास सुद्धा मदत करते.
२) केस आणि त्वचेसाठी उपयुक्त
मेथीचे दाणे केसांना लावल्याने केस गळणे थांबते. त्याचबरोबर हे रोज खाल्ल्याने त्वचा आणि केस दोघांचेही आरोग्य चांगले राहते.
३) पोषणयुक्त
मधुमेहाच्या रुग्णांना देखील डॉक्टरांकडून रोज सकाळी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
४) ब्लड शुगर- कोलेस्ट्रॉलमध्ये फायदा
डायबिटिस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने मोड आलेली मेथी न चुकता खावी. यामुळे रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. यासोबतच कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मेथी मदत करते. शरीरातील उपयुक्त नसलेला कोलेस्ट्रॉल यामुळे कमी होतो.
५) स्तनपान करणाऱ्या मातांसाठी लाभदायक
ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या मातांनी आवर्जून मोड आलेली मेथी खावी. यामुळे बाळालाही कोणताही त्रास होत नाही आणि माता, बाळ या दोघांचेही पचन उत्तम राहते.
======
हे देखील वाचा : महेश कोठारे आणि सचिन यांचे नाते कसे आहे..?
======
६) पचनासाठी उत्तम
रोज सकाळी रिकाम्या पोटी अंकुरलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यासोबतच बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोट फुगने आदी समस्या दूर होतात.
दोन चमचे मेथीचे दाणे भिजवून त्याला मोड काढा. यापेक्षा अधिक सेवन करू नये कारण पचनशक्तीवर परिणाम होऊन शरीरात गरम पडू शकतात.