Home » रताळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

रताळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उपवासाला बहुतांशजण रताळ्याचे सेवन करतात. खरंतर रताळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया याबद्दल अधिक...

by Team Gajawaja
0 comment
Healthy Food
Share

Healthy Food : रताळ हे जमिनीच्या आतमध्ये उगवले जाते. याची चव बहुतांशजणांना आवडते. याशिवाय रताळ्याच्या गोडसर, तुरट चवीमुळे काहीजण ते आवडीने खातात. रताळ वेगवेगळ्या रंगांमध्ये येते. अशातच जाणून घेऊयात रताळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे….

पोषण तत्त्वांनी समृद्ध
रताळ्यामध्ये पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. रताळ खाल्ल्याने तुमच्या शरिराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबर सारखी पोषण तत्त्वे मिळतात.

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
शरिराला हेल्दी ठेवण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा आपल्याला काही आजारांचा सामना करावा लागतो. तुम्ही दररोज एक रताळ खाल्ले तरीही सर्दी, खोकला किंवा अन्य व्हायरल इंन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. कारण रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते जे तुमच्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

पचनक्रिया सुधारली जाते
रताळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शौचास त्रास होत नाही. याशिवाय खाल्लेले अन्न पचण्यास आणि शरिरातील पचनक्रिया सुधारली जातो. रताळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅस सारखी पोटासंबंधित विकारही दूर राहतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम
भारतात हृदयरोगाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. तरुणांपासुन ते जेष्ठांमध्ये हार्ट अटॅकचा धोका येण्याची संख्या वाढली आहे. अशातच तुम्ही रताळ्यासारखे हेल्दी फूड खाऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते. जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासह हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करते. (Healthy Food)

वजन नियंत्रणात राहाते
रताळ भले चवीने गोड असले तरीही यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. याशिवाय रताळ्यात फायबरचे प्रमाण खूप असते. रताळ खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्ही अत्याधिक फूड खाण्यापासून दूर राहाता. अशातच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :

मूड स्विंग्सच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी खा हे 5 फूड्स

इन्स्टेंट नूडल्स खायला आवडतात का? आधी हे वाचा

पोटावरील चरबीमुळे मधुमेहाचा धोका? वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.