कोरोनानंतर जगामध्ये अनेक बदल झाले. गरजा बदलल्या, जीवनशैली बदलली. नोकरीचे स्वरुप बदलले. तशाच आणखीही एका क्षेत्रात कमालीची तेजी आली आहे. ते क्षेत्र म्हणजे आरोग्य विभाग. कोरोनाच्या लाटेमध्ये संपूर्ण जगात एकच विभाग अत्यंत व्यस्त होता. त्याची गरज सर्वत्र लागत होती. तो म्हणजे आरोग्य विभाग. काही देशात तर आरोग्य विभागातल्या सुट्ट्याच दोन वर्षासाठी रद्द करण्यात आल्या. कोरोनाच्या साथीमध्ये अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसनी मनोभावे रुग्णांची सेवा केली आणि त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढले. पण दुर्दैवाने ही सेवा करताना काही डॉक्टर्स, नर्सेस यांना मात्र आपला जीव वाचवता आला नाही.(Recruitment of health workers)
आता कोरोनाची साथ कमी होत असताना जगभरात या आरोग्य कर्मचा-यांची कमतरता जाणवायला लागली आहे. जर्मनी, अमेरिका, सिंगापूर सारख्या देशात तर आयटी विभागात काम करणा-यांपेक्षाही आरोग्य विभागातील कर्मचा-यांना मिळणारा पगार जास्त देण्यात येत आहे. पण तरीही योग्य असे आरोग्य कर्मचारी मिळत नसून आरोग्य कर्मचा-यांच्या या टंचाईनं युरोपिय देश काळजीत पडले आहेत. यात आपल्या देशात मात्र थोडीफार चांगली बातमी आहे. (Recruitment of health workers)कारण भारतात आरोग्य सेविकांच्या संख्येत वाढ झाली असून भारतातील प्रशिक्षित नर्सेसना युरोपिय देशात मोठी मागणी आहे. आयर्लंड, माल्टा, यूएई, बेल्जियम यासारख्या देशांनाही भारतीय परिचारिका हव्या आहेत. या परिचारिकांना चांगले वेतन आणि भत्ते देण्याचे आश्वासनही या देशांकडून देण्यात येत आहे.
जर्मनी, यूएई, सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये भारतीय परिचारिकांची मागणी वाढली आहे. एका सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत 24 हजार आरोग्य सेविकांची गरज लागणार आहे. कोरोना महामारी नंतर जगभरात छोट्या-मोठ्या सर्वच देशात आरोग्य सेविकांची मागणी वाढली आहे.(Recruitment of health workers) 2030 मध्ये या मागणीत वाढ होणार आहे. त्यातच कोरोनाच्या काळात जास्त काम, कमी पगार याला कंटाळून अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. त्यामुळेच जर्मनीपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि सिंगापूरपर्यंत आरोग्य सेविकांची मागणी वाढली आहे. या सर्व परिचारिकांना व्हिसासाठीही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. याबरोबरच उत्तम पगारही या सर्व परिचारिका आणि डॉक्टरांना मिळत आहेत.
या सर्वात भारतातील परिचारीकांना चांगले दिवस आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या देशात दरवर्षी सुमारे 60,000 परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करतात. यात डिप्लोमा धारक परिचारिका, पदवीधर परिचारिका आणि पदव्युत्तर परिचारिका असा भाग आहे. या सर्वांना त्यांच्या श्रेणीनुसार पगार दिला जात आहे. विशेषतः युएई आणि जर्मनीमध्ये परिचारिकांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेसचा अंदाज आहे की, येत्या काही वर्षांत 1.30 कोटी परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. जगभरात सर्वात जास्त परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी भारत आणि फिलीपिन्समधून बोलावले जातात. जर्मन सरकारने या वर्षी फिलिपाइन्समधून 600 परिचारिकांची भरती करण्याचा करार केला आहे. त्यांना जर्मन सरकार प्रवास खर्च तसेच राहण्यासाठी घरही देत आहे. संयुक्त अरब अमिरातीने भारतासोबत परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी करार केला. देशात 10 वर्षे राहण्यासाठी देशाने गोल्डन व्हिसा दिला आहे.(Recruitment of health workers)
============
हे देखील वाचा : Capital Gains Account Scheme चे फायदे तुम्हाला माहितेयत का?
============
ब्रिटनने केनिया, मलेशिया आणि नेपाळसोबत गेल्या वर्षभरात आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती(Recruitment of health workers) करण्यासाठी करार केले आहेत. विशेष म्हणजे या करारात परिचारिकांचा प्रवास खर्च आणि रहाण्याची व्यवस्था यांचाही समावेश आहे. सद्यपरिस्थितीत ऑस्ट्रेलिया, यूएसए, यूके, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, चिली, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया फिनलंड, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, आयर्लंड, इस्रायल, इटली, जपान, पोर्तुगाल, स्लोव्हाक प्रजासत्ताक, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन , स्वित्झर्लंड, तुर्की या देशात भारतातील आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनानंतर या सर्वांच्या पगारात भरघोस वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. माहितीनुसार, भारतीय परिचारिकांसाठी परदेशी रोजगाराचे पर्याय वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नर्सिंग विद्यार्थ्यांना जर्मन आणि जपानी भाषा शिकण्यासाठीही विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत. एकूण काय आत्तापर्यंत भारतातील आयटी इंजिनियर्संना परदेशात मोठी मागणी होती. पण आता भारतातील प्रशिक्षित परिचारिकांनाही मोठ्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन परदेशातून मिळत आहे.
सई बने…