Home » वयाच्या 35 नंतर व्यायाम करताना या गोष्टी ठेवा लक्षात

वयाच्या 35 नंतर व्यायाम करताना या गोष्टी ठेवा लक्षात

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी प्रत्येक वयोगटातील व्यक्ती व्यायाम करतो. पण वयानुसार व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वयाच्या 35 व्या वर्षानंतर व्यायाम करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

by Team Gajawaja
0 comment
Actors who faced heart attack
Share

Health Tips : आजकाल बहुतांश लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगाभ्यास आणि व्यायाम करतात. यामुळे शरिरातील फॅट्स कमी होण्यासह तुम्ही तणावापासून दूर राहाता. व्यायाम तुम्ही कोणत्याही वयात करू शकता. यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. डॉक्टरही दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देतात.

पण आपल्या सर्वांना माहितेय वाढत्या वयासह आपली हाडं ढिसूळ होऊ लागतात. यामुळे व्यक्तीमध्ये शारिरीक कसरत करण्याची क्षमता कमी होते. खासकरुन वयाच्या 35 व्या वर्षानंतर स्नायू अधिक लवचीक होण्यास त्रास होतो. अशातच वयाच्या 35व्या वर्षात व्यायाम करताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

अत्याधिक व्यायाम करणे
वयाच्या 35 व्या वर्षानंतर रिकव्हरी अॅबिलिटी कमी होते. यामुळे अत्याधिक व्यायाम केल्याने तुम्हाला दुखापत होऊ शकतो. आठवड्यातून तीन ते चार दिवस व्यायाम केला पाहिजे. दररोज 45 मिनिटे व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

वार्म अप आणि कूल डाउन
व्यायामाआधी आणि नंतर वार्म अप आणि कूल डाउन होणे विसरू नका. यामुळे तुमचे स्नायू रिलॅक्स होण्यासह कोणत्याही दुखापतीपासून तुम्ही दूर राहू शकता.

चुकीच्या पद्धतीने व्यायाम
चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने दुखापत होण्याची शक्यता अधिक वाढली जाते. यामुळे जिम ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करा.

हाइड्रेट राहा
व्यायाम केल्याने शरिरातून घाम निघतो. अशातच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता. यामुळे लक्षात ठेवा, व्यायामादरम्यान थोड्याथोड्या वेळाच्या अंतराने पाणी प्यावे. (Health Tips)

हेव्ही व्यायाम करणे टाळा
वयाच्या 35 व्या वर्षानंतर हेव्ही व्यायाम करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही योगा, वॉकिंग सारख्या एक्सरसाइज करू शकता. नेहमीच लक्षात ठेवा की, व्यायाम करण्याचा मुख्य उद्देश फिट राहण्यासह हेल्दी आयुष्य जगणे आहे.

(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
हिवाळ्यात हातापायांना सूज येते, करा हे घरगुती उपाय
90-30-50 च्या डाएट प्लॅनने फटाफट वजन होईल कमी, फॉलो करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
हिवाळ्यात सांधेदुखीपासून दूर राहण्यासाठी करा ही सोपी योगासने

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.