Home » Health : त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जास्वंदीचे फुल

Health : त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जास्वंदीचे फुल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे सर्रास विसरतो. काम आणि घर या दोन गोष्टींमध्ये प्रत्येक जणं तारेवरची कसरत करत असतो. यात आरोग्य कुठेच नसते. त्यामुळे अनेकांना हळूहळू विविध समस्या जाणवायला लागतात. खासकरून त्वचा आणि केसांशी निगडित असलेल्या अनेक समस्या सगळ्यांना जाणवतात. आता अनेकांना यावर उपचार तर करायचे असतात, मात्र एकत्र खर्च आणि दुसरे म्हणजे उपचारांचा साइड इफेक्ट होण्याची भीती. त्यामुळे अनेक लोकं जमेल तसे घरगुती उपचार करतात. मात्र तरीही काहींना फरक काही पडत नाही. अशा या समस्यांसाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि खात्रीशीर घरगुती उपाय सांगणार आहोत. (Hibiscus Flower )

आपल्या सगळ्यांनाच जास्वंदीचे फुल माहीतच आहे. गणपतीचे अतिशय आवडते फुल म्हणून या फुलाला गणेश पूजनात मान आहे. या फुलाचे जेवढे धार्मिक महत्व आहे तेवढेच महत्व आरोग्याच्या दृष्टीने देखील आहे. लाल, पांढऱ्या, गुलाबी, केशरी, पिवळ्या अशा नानाविध रंगांमध्ये असलेले जास्वंदाचे फुल नेहमीच आपले लक्ष वेधून घेते. आयुर्वेदामध्ये या फुलाचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. जास्वंदीचे फूल खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून अनेक केसांच्या आणि त्वचेच्या आजारांसोबतच इतरही अनेक आजारांपासून दूर राहता येते. (Marathi News)

जास्वंदीच्या फुलात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांची वाढ होऊन केसांची गुणवत्ता सुधारते. या फुलात प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह इतर पोषक घटक सुद्धा आढळून येतात. जास्वंदीच्या फुलामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले जास्वंदीचे फुल चेहऱ्याचे हानिकारक बॅक्टरीयापासून रक्षण करते. जाणून घेऊया जास्वंदीच्या फुलाचे आरोग्यदायी फायदे. (Top HEalth News)

Health

केसगळती थांबवण्यासाठी
जास्वंदाचे फूल हे केसगळतीवर उत्तम उपाय आहे. मुख्य म्हणजे या फुलाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. जास्वंदाच्या फुलामध्ये असणारे अँटीफंगल गुणधर्म हे स्काल्पवरील जीवाणू काढून टाकतात आणि त्यामुळे केसांमध्ये येणारी खाज आणि केसगळतीची समस्या दूर होते. यासाठी जास्वंदीची ५ ते ६ फुलं आणि पानं एकत्र घेऊन ते स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट केसांना लावावी आणि साधारण ३ तास ठेवावे. त्यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्यावे. हा उपाय काही दिवस केला तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम केसांवर दिसून येईल. (Top Marathi Headline)

जास्वंदीच्या तेलाचे फायदे
जास्वंदाच्या फुलामध्ये बरेच जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे मेलेनिन तयार होते. अर्धा कप नारळाच्या तेलात एक चमचा जास्वंदाचे तेल मिक्स करून हे तेल रात्री केसांना लावावे. त्यानंतर सकाळी केस थंड पाण्याने धुवावे. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होते. जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली, तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. तसेच नवीन केसही वाढतात. (Todays Marathi HEadline)

जास्वंदाच्या फुलाचे तेल घरी तयार करण्यासाठी तीन जास्वंदाची फुले घ्या आणि खोबरेल तेल पाच चमचे घ्या. त्यानंतर खोबरेल तेलामध्ये हे फुले मिक्स करा आणि वीस मिनिटांसाठी गॅसवर गरम करा. एकदा तयार केलेले जास्वंदाचे तेल आपण आठ दिवस वापरू शकतो. जास्वंदाची फुले वाळवून त्याची पावडर तयार करू शकतो. ही पावडर आपण तेलामध्ये मिक्स करून तेल गरम करून केसांची मालिश केल्यास देखील फायदा मिळतो. (Top Trending News)

केसांमधील कोंडा घालवण्यासाठी
कोंड्यामुळे केसात खाज सुटणे, चेहऱ्यावर मुरूमं येणे आदी समस्या निर्माण होतात. या समस्येपासून वाचण्यासाठी जास्वंद आणि त्याची पाने कुटून त्याची पावडर बनवावी किंवा बाजारात रेडिमेड मिळणारी जास्वंदीच्या फुलाची पावडर आणावी. ही पावडर हिना अथवा मेंदीमध्ये मिक्स करून त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण केसांना लावावे आणि एक तासानंतर केस धुवा. (Marathi Latest News)

Health

 

जास्वंदीच्या फुलांचा हेयरपॅक
जास्वंदीच्या फुलांचा हेयरपॅक केसांना लावल्यास केसांना चमक येईल, केसांची वाढ होईल आणि केसांना नैसर्गिक कंडिशनिंग मिळेल. हा हेयर पॅक तयार करण्यासाठी जास्वंदीची फुले आणि पाने तुम्ही वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडेसे दही मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही केसांना साधारण एक तास लावा आणि मग माईल्ड शँपूने केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा हेअरपॅक वापरू शकता. दही उपलब्ध नसेल तर तुम्ही केवळ जास्वंदीची फुले आणि पानाची पेस्टही केसांना लाऊ शकता. (Top Stories)

==========

हे देखील वाचा :  Moonsoon Tips : पावसाळ्यात डोकेदुखी ठरणाऱ्या माशांसाठी रामबाण उपाय

===========

त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी
त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी जास्वंदीचे फेस पॅक अतिशय उपयुक्त आहे. यासाठी एका वाटीमध्ये ३ किंवा ४ जास्वंदीची फुलं बारीक करून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये दही टाकून मिक्स करा. हे फेसपॅक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून १० किंवा १५ मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यासोबतच जास्वंदीच्या पावडरमध्ये मध टाकून फेस पॅक तयार केल्यास ते देखील अंगिंगमध्ये फायदेशीर ठरू शकते. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.