Home » Health Tips: शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? तर सेवन करा ‘हे’ पदार्थ 

Health Tips: शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? तर सेवन करा ‘हे’ पदार्थ 

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health Tips
Share

आपले शरीर योग्यपद्धतीने काम करण्यासाठी त्याला अन्न आणि पाण्याची गरज असण्यासोबतच अनेक इतर गोष्टींची गरज असते. जसे की, प्रथिने, प्रोटीन, कॅल्शियम आदी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. यातले सर्वात महत्वाचे असते ते कॅल्शियम. कॅल्शियम हे एक महत्वाचे खनिज आहे. कॅल्शियमशिवाय आपल्या शरीरातील कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. शरीरात मुबलक कॅल्शियम नसेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळावे यासाठी कॅल्शियमयुक्त पौष्टिक आहार घेणे देखील आवश्यक असते.  (HEalth Tips)

निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. कॅल्शियम केवळ हाडे आणि दात मजबूत करत नाही, तर स्नायूंची ताकद, मज्जातंतूंचे कार्य आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका बजावते. जर व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस, स्नायू क्रॅम्प, कमकुवत नखे, चालताना मांड्या आणि हात दुखणे, हात-पायाला मुंग्या येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. (Marathi News)

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वजन आणि उंचीनुसार कॅल्शियमची गरज असते. व्यक्तीच्या शरीरातील कॅल्शियमच्या दररोजच्या सरासरी गरजेबद्दल सांगायचे झाले तर पुरुषांसाठी प्रतिदिवस किमान १००० ते १२०० मिलीग्राम कॅल्शियम आवश्यक असते तर महिला आणि वृद्धांसाठी १२०० ते १५०० मिलीग्राम, गरोदर स्त्रिया आणि बाळांना दूध पाजणाऱ्या स्त्रियांसाठी १००० मिलीग्राम, आणि मुलांसाठी १३००  मिलीग्राम कॅल्शियम गरजेचे असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ कॅल्शियम असून शरीराची गरज भागात नाही. कॅल्शियम शरीरात शोषून घेणेही आवश्यक आहे. यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज सकाळचा सूर्यप्रकाश उपयुक्त ठरतो.  सहज आणि सोप्या पद्धतीने कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढायची? यासाठी घरगुती काही उपाय आपण जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Calcium

सोया दूध
सोया दूध हे आपल्या सामान्य दुधाला एक उत्तम पर्याय आहे, खास करून ज्या लोकांना ज्यांना लैक्टोज इंटॉलिरेंट आहे अशांसाठी हे दूध वरदान आहे. सोया दुधामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम असते आणि बहुतेकवेळा कॅल्शियम फोर्टिफाइड देखील असते. एक कप सोया दूधमध्ये सुमारे ३०० मिलीग्राम कॅल्शियम असते, जे दुधासारखेच असते. प्रथिनांची समृद्ध असलेले हे दुध हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. (Marathi Trending News)

चिया सीड्स
शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी चिया सीड्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. २ मोठे चमचे  चिया सीड्समध्ये १७९ मिलीग्राम कॅल्शियम असते. चिया सीड्स मध्ये बोरॉन देखील असते, जे शरीराला कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे चयापचय करण्यास मदत करून हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यास अधिक सुधारते.

वाळलेले अंजीर
एक कप किंवा आठ अंजीर खाल्ल्याने २४१ मिलीग्राम कॅल्शियम मिळू शकते. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय त्यात लोहाचे प्रमाणही जास्त असते. (Marathi Latest News)

टोफू
टोफू कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. अर्धा कप टोफूमध्ये २७५ ते ८६१ मिलीग्राम कॅल्शियम असते. टोफूमध्ये कॅल्शियमसोबतच, प्रथिने, लोह, सेलेनियम, अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात.

बदामाचे दूध
बदामाचे दूध कॅल्शियमने समृद्ध आहे. नैसर्गिक बदामाच्या दुधात कॅल्शियमचे प्रमाण कमी असले तरी, बाजारात उपलब्ध असलेल्या फोर्टिफाइड बदामाच्या दुधात प्रत्येक कपमध्ये ४५० मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असते. (Top Stories)

संत्री ज्यूस
संत्री ज्यूस हा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे. एक कप संत्र्याच्या ज्यूसमध्ये ३५० मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असू शकते. याशिवाय संत्र्याचे ज्यूस हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आणि पचनासाठी देखील फायदेशीर असते.

============

हे ही वाचा : 

Health : त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जास्वंदीचे फुल

Water : दिवसभरात किती पाणी प्यावे?, जास्त पाणी पिण्याचे तोटे

=============

ताक
ताक हे दह्यापासून बनवलेले पेय आहे, जे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियमसोबतच प्रोबायोटिक्स असतात, जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात. एक कप ताकात सुमारे ३०० मिलीग्राम कॅल्शियम असते.  (Social Updates)

> शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या, दूध, दही, कच्चे चीज, ब्रोकोली, बीट, पालक, केळी, सोयाबीन, अंडी, मासे, बदाम, काजू, दूध, दही, पपनस, किवी, द्राक्ष यांचा आहारात समावेश लाभदायक असतो. मात्र एक लक्षात घ्या, कॅल्शियमची कमतरता आणि जास्त कॅल्शियम हे दोन्ही हानिकारक आहेत. कॅल्शियम आवश्यकतेपेक्षा जास्त घेतल्यास शरीरात स्टोनची समस्या उद्भवू शकते. याशिवाय हाडांमध्ये जडपणा येऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करा.

(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.