सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अशातच घरी पाहुण्यांची वर्दळ ते पार्टीचे प्लॅन केले जातात. घरात विविध स्वादिष्ट पदार्थ, मिठाई तयार केली जाते. हे पदार्थ सणासुदीला खाताना आपण आपल्या तोंडावर कंट्रोल करू शकत नाही.पण तुम्हाला माहितेय का, सणासुदीला तुम्ही गोड पदार्थ खाऊनही बर्न करू शकता कॅलरीज. सणाला जिमला जाणे किंवा वॉकला जाण्यास वेळ मिळत नाही. अशातच बहुतांशजणांना बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, आळस, वजन वाढणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. आपण फिट रहावे म्हणून वॉकला जाऊ शकता. हा एक अत्यंत सोप्पा पर्याय आहे. जेणेकरुन तुमच्या शरीरातील कॅलरीजही बर्न होतील. परंतु दररोज किती स्टेप्स चालले पाहिजे, एक्स्ट्रा कॅलरीज कशी बर्न करायची याच बद्दल सर्वकाही जाणून घेऊयात. (Health Tips)
-टार्गेट सेट करा
फिट राहण्यासाठी एक टार्गेट सेट करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे फेस्टिव्ह सीजनमध्ये ट्रॅकवर राहण्यासाठी मदत होईल. सर्वसामान्यपणे शरीराला अॅक्टिव्ह आणि फिट ठेवण्यासाठी जवळजवळ १० हजार स्टेप्स चालणे फायदेशीर मानले जाते. पण सणाला ऐवढा वेळ मिळत नसल्याने तुम्ही ५-६ हजार स्टेप्स चालू शकता. कधीकधी हे टार्गेट मोठे वाटेल. पण ते पूर्ण करण्याचा विचार केला तर कॅलरीज बर्न नक्कीच होतील.
वेळ काढा
एक आइडियल स्टेप काउंट व्यक्तीचा फिटनेस आणि किती वेळ तुम्ही यासाठी देऊ शकता यावर निर्भर असतो. जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल तर १० हजार स्टेप्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ऐवढे होणार नाही पण ४-५ हजार स्टेप्स तरी जरूर चाला. काही वेळेस सणासुदीला काम आणि लेट नाइट पार्टीमुळे सकाळी वॉक करण्यास वेळ मिळत नाही. अशा स्थितीत स्टेप्स पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करण्यासाठी जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा ब्रिस्क वॉक जरुर करा.
सकाळी किंवा रात्री वेळ काढा
जर तुम्हाला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही सकाळी किंवा रात्री थोडावेळ वॉकसाठी जरुर जा. सकाळी ५-७ दरम्यान अधिक कामे नसतात. या दरम्यान तुम्ही वॉकसाठी जाऊ शकता. काम पूर्ण केल्यानंतरही रात्री जाऊ शकता. खरंतर रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. (Health Tips)
पुढील काही टिप्सही येतील कामी
-जर तुम्हाला वॉक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर लिफ्ट ऐवजी स्टेअर्सचा वापर करा
-दुपारी आणि रात्रीच्या जेवणानंतर वॉक करा
-वॉक करण्यासह रनिंगही करा
-कॅलरीज बर्न करण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटी जरुर करा
-कामादरम्यान लहान-लहान ब्रेक नक्कीच घ्या
हेही वाचा- दिवाळीत पाहुण्यांच्या हेल्थची अशी घ्या काळजी