आजच्या काळात आपण एक शब्द अनेकदा ऐकत असतो आणि तो म्हणजे ‘बॉडी डिटॉक्स’. मोठमोठे डायटिशियन, डॉक्टर, योगा टीचर आदी अनेक तज्ज्ञ लोकांच्या तोंडी हा शब्द बोलताना येतोच येतो. सोशल मीडियावर देखील या बॉडी डिटॉक्सच्या संदर्भातील अनेक रील व्हायरल होताना दिसतात. मग नक्की बॉडी डिटॉक्स असते तरी काय? बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक असते का? बॉडी डिटॉक्स करण्याचे काय फायदे असतात? बॉडी डिटॉक्स कशी केली जाते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. (Health Care)
आपले शरीर हे एक मशीन सारखेच आहे. आपण जशी आपल्या घरातील, कारखान्यातील, ऑफिसमधील आदी अनेक ठिकाणी असलेल्या मशीनची काळजी घेतो, त्यांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेतो. ते पूर्ण उघडून त्यांना स्वच्छ करतो. अशीच काळजी आपल्याला आपल्या शरीराची घेणे देखील आवश्यक असते. आपले शरीर आपण कायम वरून स्वच्छ करत असतो. दररोज अंघोळ करून, महिन्यात दोन महिन्यात पार्लरमध्ये जाऊन आपण नेहमीच आपल्या शरीराच्या बाह्य भागाची काळजी घेतो. मात्र आपल्या शरीराच्या अंतर्गत असलेल्या भागाची काळजी कोण घेणार? त्याच्या स्वच्छतेचे काय? जसे आपले शरीर वरून खराब होते, तसे ते आतून देखील खराब होतच असते. त्यासाठी बॉडी डिटॉक्स करणे खूपच आवश्यक आहे. (Marathi News)
आपण दररोज जे काही खातो, पितो ते आपल्या शरीरात जाऊन त्यातील आवश्यक घटक शरीराला पुरवले जातात आणि अनावश्यक घटक विष्ठेतून, मूत्रातून, घामातून शरीराच्या बाहेर टाकले जातात. मात्र असे असले तरी अनेकदा आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ होत नाही. त्याचा काही भाग आपल्या शरीरात तसेच अडकून राहतो. यामुळेच आपल्याला वेळोवेळी आपले शरीर डिटॉक्स करणे आवश्यक असते. डिटॉक्सिफिकेशनमुळे शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आणि तंदुरुस्त राहतो. त्यात अडकलेली घाण शरीरातून निघून जाते. यामुळे तुमचे शरीर अधिक उत्तम पद्धतीने त्याचे कार्य करू शकते. शरीरातील विषारी द्रव्यपदार्थ बाहेर काढण्यासाठी आठवड्यातून एकदा बॉडी डिटॉक्स करण्याची गरज असते. (Todays Marathi HEadline)
आजच्या आधुनिक काळात आपण भेसळ युक्त पदार्थ जास्त खातो. आपल्याला सेंद्रिय पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होत नाही, त्यामुळे जे आहेत तेच आपण वापरतो. आजतरी प्रत्येक पदार्थांमध्ये, धान्यांमध्ये, भाज्यांमध्ये, खाण्या-पिण्याच्या सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केल्याचे दिसून येते. मात्र यासाठी आपण जास्त काही करू शकत नाही. ही भेसळ शरीरासाठी खूपच त्रासदायक आहे. शिवाय आजकाल महिलांमध्ये ब्युटी प्रोडक्ट वापरण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. यामध्ये असलेली घातक रसायने देखील अत्यंत हानिकारक असतात ज्यामुळे भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. (Top Marathi Headline)
यामुळेच यकृत आणि मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक असते. जर आपल्या शरीरातील विषारी द्रव्य वाढली तर आपल्याला आळस येणे, वजन वाढणे, पचनक्रिया बिघडणे, पोटात गॅस होणे, अपचन, जळजळ, अंगदुखी, मळमळ होणे, टेन्शन येणे आदी अनेक त्रास होऊ शकतात. शरीरात विषारी पदार्थ साठून राहिले तर त्याचा परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून ते ब्लड प्रेशर आणि डायबिटीस वाढण्यापर्यंत होताना दिसतो. यासाठी वेळोवेळी शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. (Social News)
शरीर डिटॉक्स केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहते. शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात त्यामुळे सूज येण्याची समस्या होत नाही. चयापचयची क्रिया वाढते आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. वाढत्या कोलेस्ट्रॉलवरही यामुळे नियंत्रण ठेवता येते. किडनी, यकृत आणि पोटाच्या आजारांपासून संरक्षण होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आपण काही घरगुती सोपे उपाय देखील करू शकतो. शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करणे जास्त फायदेशीर असते. जाणून घेऊया डिटॉक्सचे सोपे उपाय. (Latest Marathi HEadline )
* आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी त्रिफळा हा उत्तम पर्याय आहे. आवळा, हरितकी आणि बभितकी या तीन पदार्थांपासून त्रिफळा चूर्ण तयार होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून घ्यावे. त्यामुळे सकाळी शौचावाटे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे आतडी स्वच्छ होतात. त्रिफळा चूर्ण Gut Health साठी उपयोगी असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. (Marathi Trending Headline)
* शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी तुम्हाला साखरेपासून दूर राहावे लागेल. साखरेचा अति वापर हे विषासारखे आहे, त्यामुळे साखरेचा वापर शक्यतो टाळा.
* डिटॉक्स ड्रिंक घेतल्याने देखील शरीर उत्तम प्रकारे डिटॉक्स होऊ शकते. यासाठी जिरे, धणे, मेथीचे दाणे आणि एका जातीची बडीशेप घेऊन हे सर्व भाजून घ्यावे. त्याची पावडर बनवून ही पावडर दररोज रात्री कोमट पाण्यात मिसळा आणि रात्रभर झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर, हे पाणी गाळून प्यावे. मात्र हे पाणी एकादमात पिऊ नका हळूहळू प्यावे. (Marathi Top News)
* ऊसाचा रस पिण्यापेक्षा ऊसाचे तुकडे चाऊन चाऊन खाण्याने देखील शरीर डिटॉक्स होते. ऊस हा कावीळवरील नैसर्गिक उपाय असून ऊसाच्या रसात असणारे ग्लायकॉलिक अॅसिड त्वचा आतून अधिक हेल्दी बनवते आणि कोलाजन टिश्यूजदेखील रिस्टोअर करते, ज्यामुळे तुम्हाला अॅक्ने वा मुरूमांसारखे त्वचेच्या समस्या त्रासदायक ठरत नाहीत. (Marathi Latest News)
* शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी प्यायल्याने हानिकारक विषारी पदार्थ किडनीद्वारे बाहेर टाकले जातात. शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते आणि पचनक्रियाही निरोगी राहते. (Social Updates)
==========
हे देखील वाचा : Health : छातीत कफ साठल्यामुळे त्रास होतो? ‘हे’ उपाय करा आणि आराम मिळवा
Health : बीटचे सेवन केल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
============
* बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ताकाचे पंचकर्म करणे देखील लाभदायक ठरू शकते. आयुर्वेदात ताकाला अनेक आजारांवर औषध मानले गेले आहे. आहारात नियमित ताकाचा समावेश केल्यास ताक शरीराला आतून स्वच्छ करते. तसेच विषारी घटक द्रव्य शरीराच्या बाहेर फेकण्यास मदत करते. ताकाचे पंचकर्म करण्याआधी आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. ताक पंचकर्म करताना ताकाव्यतिरिक्त काहीही खाऊ नये काहीही पिऊ नये. भूक लागली तरी ताक प्यायचे आणि तहान लागली तरी ताक प्यायचे. अशा प्रकारे किमान दोन ते तीन दिवस केवळ ताक पिणे याला ताक पंचकर्म म्हणतात. (Top Stories)
* चहा आणि कॉफीचे जास्त सेवन करणे हानिकारक असू शकते, म्हणून हर्बल चहा घ्या. हर्बल टी किंवा कॅमोमाइल चहाचे सेवन केल्याने पचनसंस्थेच्या समस्येपासून आराम मिळतो. हर्बल टी रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics