Home » Health Care : वारंवार सर्दी-खोकला होणे हे कमजोर रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Health Care : वारंवार सर्दी-खोकला होणे हे कमजोर रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

by Team Gajawaja
0 comment
Cold & cough remedies
Share

Health Care : थोडं हवामान बदललं, पाऊस पडला किंवा थंडी वाढली की लगेच सर्दी-खोकला होतो, अशी तक्रार अनेक जण करतात. काही लोकांना वर्षातून ५–६ वेळा तरी सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा ताप येतो. अशावेळी मनात प्रश्न निर्माण होतो की वारंवार सर्दी-खोकला होणे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे का? प्रत्यक्षात, हे नेहमीच कमकुवत इम्युनिटीचं लक्षण असतं असं नाही, पण काही वेळा शरीराकडून मिळणारा हा इशारा दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते.

१. वारंवार सर्दी-खोकला होण्याची सामान्य कारणे

सर्दी-खोकला होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सतत प्रदूषण, धूळ, धूर, एसीमध्ये जास्त वेळ राहणे, तसेच हवामानातील अचानक बदल यामुळे श्वसनमार्गावर परिणाम होतो. लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक दिसून येतो. याशिवाय अपुरी झोप, ताणतणाव, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीराची संरक्षणक्षमता तात्पुरती कमी होते, त्यामुळे संसर्ग पटकन होतो.

Health Care

Health Care

२. हे कमजोर रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण कधी मानावे?

जर एखाद्या व्यक्तीला खूपच लवकर आजार होणे, साधी सर्दी बरी व्हायला २–३ आठवडे लागणे, सतत थकवा जाणवणे किंवा वारंवार ताप येणेअसे त्रास होत असतील, तर ते कमजोर रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण असू शकते. विशेषतः जर सर्दी-खोकल्यासोबत वजन घटणे, श्वास घेण्यास त्रास किंवा सतत संसर्ग होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही वेळा व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन C किंवा झिंकची कमतरताही यासाठी कारणीभूत ठरते.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी उपाय

इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संतुलित आहार. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, लिंबूवर्गीय फळे, आवळा, आले, लसूण आणि हळद यांचा समावेश करा. दररोज किमान ७–८ तास झोप घेणे आणि नियमित हलका व्यायाम किंवा योग करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. कोमट पाणी पिणे, वाफ घेणे आणि साखर व जंक फूड कमी करणे यामुळे सर्दी-खोकल्याचा धोका कमी होतो.(Health Care)

=========

हे देऱखील वाचा :

Winter Breathing Problems : थंडीत श्वास घेण्यास त्रास होत असल्यास करा ही कामे, मिळेल आराम

Health Care : आजपासून खाण्यास सुरु करा ब्रोकोली, लठ्ठपणासह हृदयासंबंधित समस्या होतील दूर

Bad Cholesterol Control : शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल असे करा कंट्रोल, आहारात खा हे पदार्थ

=========

४. जीवनशैलीतील बदल का आहेत गरजेचे?

फक्त औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. धूम्रपान टाळणे, मद्यपान मर्यादित ठेवणे आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान-प्राणायाम करणे इम्युनिटीसाठी उपयुक्त ठरते. स्वच्छतेची काळजी घेणे, हात वारंवार धुणे आणि आजारी व्यक्तींपासून अंतर ठेवणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.