Health Care Tips : आरोग्यासह आपल्या त्वचेची देखील काळजी घेणे अत्यावश्यक असते. हेल्दी त्वचेसाठी दररोज आपल्या रूटीनमध्ये सनस्क्रिनचा समावेश बहुतांशजण करतात. उन्हाळा असो किंवा हिवाळा, त्वचेच्या सुरक्षितेसाठी सनस्क्रिनचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहितेय का सनस्क्रिनच्या सततच्या वापरामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होऊ शकते?
काही लोक मानतात की, सनस्क्रिन लावल्याने शरीरातील व्हिटॅमिन डी कमी होते. यापूर्वी देखील यासंदर्भात काही रिसर्च करण्यात आले आहेत. हार्वर्डच्या एका रिपोर्ट्सनुसार, सनस्क्रिन हे युव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. याचा अर्थ असा होतो की, सनस्क्रिनचा वापर केल्याने व्हिटॅमिन डी चा स्तर कमी होतो.
एक्सपर्ट्स काय म्हणतात?
एक्सपर्ट्स असे म्हणतात की, सनस्क्रिनमुळे व्हिटॅमिन कमी होणे याबद्दल बोलणे थोडं मुश्किल आहे. कारण सनस्क्रिनमुळे त्वचेचे संरक्षण होते. परंतु व्हिटॅमिन डी च्या स्तराबद्दलच्या संभाव्य प्रभावांबद्दल विचार करणे गरजेचे आहे.
बहुतांश लोक मानतात की, अधिक एसपीएफ असणारी सनस्क्रिन व्हिटॅमिन डी ब्लॉक करते. यामुळे सनस्क्रिनचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. (Health Care Tips)
युव्ही किरणांचा प्रभाव
सनस्क्रिन लावून देखील त्वचेवर युव्ही किरणांचा परिणाम होतो. पण काही लोक सनस्क्रिनचा व्यवस्थितीत वापर करत नाहीत. एक्सपर्ट्स सांगतात की, प्रत्येक दोन तासांनी सनस्क्रिन लावावे. याशिवाय शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होत असल्यास आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेस कोवळ्या उन्हात उभं राहावे.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)