बहुतांश लॉक कॉर्पोरेट मध्ये नोकरी करतात. जेथे कमीत कमी ८-९ तास बसून काम केले जाते. एकाच जागेवर बसून काम करण्याचे काम कोणालाच आवडत नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का एकाच जागेवर दीर्घकाळ बसून राहून काम केल्याने काय नुकसान होते? याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही बसूच नये. जरी बसून दीर्घकाळ काम करत असाल तरीही त्या दरम्यान मध्ये मध्ये उठावे. अन्यथा त्याचे उलट परिणाम आरोग्यावर दिसून येतात. (Health Care Tips)
दीर्घकाळ बसून राहणे ठरु शकते धोकादायक
दीर्घकाळ बसून राहिल्याने तुमचे आरोग्य आणि शरिरावर शॉर्ट-लॉन्ग टर्मसाठी परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ बसून राहिल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या सुद्धा उद्भवतात. यामुळे तुमच्या मेटाबॉलिक आरोग्यासह समस्या निर्माण करतात. अशा लोकांना उच्च रक्तदाब, हाय ब्लड शुगर, लठ्ठपणा आणि बॅड कोलेस्ट्रॉल सारखे आजार होण्याची शक्यता असते.
दीर्घकाळ बसून राहिल्याने होणारे नुकसान
-वजन वाढणे
जर तुम्ही नियमित फिजिकल अॅक्टिव्हिटी करत असाल तर तुमचे स्नायू लिपोप्रोटीन लाइपेज सारखे मॉलिक्युल्स रिलिज करतात. त्यामुळे याच्या माध्यमातून फॅट आणि शुगरची प्रोसेस करण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही खुप वेळ बसून काम करता तेव्हा हे मॉलिक्युल्स कमी उत्सर्जित होतात. त्यामुळे आपल्या कंबरेखालच्या भागात चरबी अधिक वाढली जाते. जर तुम्ही व्यायाम करत असाल तरीही तुम्हाला मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका उद्भवू शकतो.
-पाठीवर पडतो प्रभाव
दीर्घकाळ बसून राहिल्याने आपल्या पाठीचे स्नायू, मान आणि पाठीचा मणका यावर परिणाम होतो. झुकलेल्या अवस्थेत बसल्याने पाठीचा मणक्याच्या लिगामेंट्स आणि डिस्कवर ही दबाव पडतो. एका काळानंतर पाठीच्या मणक्याची संरचनेला नुकसान होते. अशातच पाठ आणि मान दुखण्याची समस्या राहते.
-पायांना त्रास
संपूर्ण दिवस बसून रहिल्याने कंबरेखालील हिस्सा आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. स्नायूंच्या याच कमकुवतपणाला एट्रोफी असे म्हटले जाते. मजबूत पाय आणणि ग्लूट स्नायूंशिवाय तुम्ही स्थिर राहू शकत नाही. तुम्हाला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते. (Health Care Tips)
-एंग्जायटी वाढण्याची शक्यता
मोबाईलची स्क्रिन पाहण्यातच बहुतांश लोक एकाच ठिकाणी बसून राहतात. असे केल्याने झोपचे वेळापत्रक बिघडले जातेच. पण तुमच्यात एंग्जायटीचा स्तर वाढतो. अशा प्रकारे तुम्ही एकट्यात खुप वेळ घालवता आणि आपल्या प्रियजनांपासून दूर राहता.
हे देखील वाचा- Back Acne मुळे त्रस्त असाल तर अशी घ्या काळजी
काय केले पाहिजे?
ऑफिसमध्ये दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहण्याऐवजी तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घ्या. या व्यतिरिक्त काही टीप्स फॉलो करा.
-प्रत्येक ३० मिनिटानंकर ब्रेक घ्या आणि जागेवरुन उठा
-बसण्यासाठी एर्गोनॉमिक खुर्ची निवडा. त्याची उंची योग्य असेल आणि पाठीला सुद्धा सपोर्ट मिळेल
-जर तुम्हाला ब्रेक घेता येत नसेल तर खुर्चीवर बसूनच थोडी स्ट्रेचिंग करा
-लिफ्टच्या माध्यमातून जाणे टाळा
-चहा-कॉफी पिण्यासाठी ब्रेक घ्या