Home » तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय अस्थमाचे कारण ठरु शकते

तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय अस्थमाचे कारण ठरु शकते

by Team Gajawaja
0 comment
Health care tips
Share

तोंड उघडं ठेवून झोपणे जीवघेणे ठऱु शकते. खरंतर तुम्ही सुद्धा तोंड उघडून झोपत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. तज्ञांच्या मते, रात्री झोपताना तोंड उघडे राहिल्यास तर काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ही सवय लवकरात लवकर सुधारा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. (Health Care Tips)

जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा नाकाऐवेजी तोंडाने श्वास घेता. अशा स्थितीत आपले तोंड उघडे राहते. यालाच तोंड उघडे ठेवून झोपणे असे म्हटले जाते. पण नक्की असे का होते. परंतु असे तुम्हाला सवय असते त्यामुळे होते. मात्र काही वेळेस एखाद्या आजाराचे सुद्धा कारण असू शकते, यामुळेच आपण नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतो.

उदाहरणार्थ, सर्दी होतो तेव्हा नाकाद्वारे श्वास घेण्यास समस्या येते. तेव्हाआपण तोंडाने श्वास घेत राहतो. तसेच काही वेळेस अधिक टेंन्शन असेल तरीही ही समस्या होऊ शकते. कारण यावेळी तुम्ही खुप वेगाने श्वास घेत असता. अधिक तणाव आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर झोपेसाठी सुद्धा फायदेशीर नाही. आता अशा काही आजारांबद्दल जाणून घेऊयात जेव्हा तुम्ही तोंड उघडे करुन झोपत. तु्म्ही यापैकी एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तोंड उघडे ठेवून झोपण्याचे नुकसान

-अस्थमा
जर तुम्ही तोंड उघडे ठेवून झोपत असाल तर लक्षात ठेवा यावेळी फुफ्फुसे अधिक ताकदीने काम करते. यामुळेच त्याला सूज येते. अशा स्थितीमुळे तुम्ही अस्थमा ग्रस्त होऊ शकता.

-हृदयासंबंधित समस्या
तोंड उघडे करुन झोपणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकची रिस्क दुसऱ्यांच्या तुलनेत काही पटींनी अधिक असते. खरंतर जेव्हा तुम्हा नाकाऐवजी तोंडाने श्वास घेता तेव्हा शरिराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे धमन्यांमध्ये ब्लड फ्लो प्रभावित होऊ शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो. (Health Care Tips)

–ओठांना नुकसान पोहचते
रात्रीच्या वेळेस तोंड उघडे करुन झोपल्याने तु्म्हाला काही गंभीर समस्या होतात. परंतु त्यावेळी तुमचे तोंड सुकते आणि याच कारणास्तव तुमच्या ओठांना नुकसान पोहचते. तोंडात असलेल्या द्रव पदार्थ सुकल्याने तुमचे ओठ फाटू शकतात.

हेही वाचा- हेल्दी टाएटमुळे PCOD बरा होऊ शकतो?

–थकवा जाणवतो
तोंड उघडे ठेवून झोपल्यानंतर श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. याच कारणास्तव तुमच्या फुफ्फुसात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. फुफ्फुसात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे थकवा जाणवू शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.