Health Care Tips : पीरियड्स हा महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि नियमित होणारा शारीरिक भाग आहे. या काळात शरीरात संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे काही शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात स्वतःची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. पाळीवेळी काही महिलांना पोटात भयंकर दुखते किंवा थकवा जाणवतो. पण पाळी दरम्यान महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया…
स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. दर 4-6 तासांनी सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कप बदलावा. यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते. वापरलेली पॅड्स योग्य पद्धतीने लपेटून कचऱ्यात टाकाव्यात. जनरल साबणाऐवजी सौम्य किंवा खास योनिस्वच्छतेसाठी तयार केलेले उत्पादने वापरावीत. शरीराच्या खालच्या भागाची स्वच्छता राखली गेली नाही, तर जीवाणू वाढण्याची शक्यता अधिक असते.
पाणी आणि आहाराकडे लक्ष द्या
या काळात शरीरात पाण्याची कमतरता होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. तसेच पौष्टिक आणि हलका आहार घ्या. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी युक्त अन्न घेतल्याने थकवा, चिडचिड, पोटदुखी यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो. जास्त मसालेदार, तेलकट किंवा साखरयुक्त अन्न टाळावे, कारण यामुळे सूज व अपचन वाढू शकते.(Health care during periods)

Health Care Tips
आराम आणि पुरेशी झोप घ्या
पाळीच्या वेळी शरीर थकल्यासारखे वाटते. यामुळे पुरेसा आराम आणि झोप घेणे गरजेचे आहे. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिडेपणा व मानसिक थकवा वाढतो. गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्यास पाळीच्या वेदना कमी होतात. हलका व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा योगासने केल्यासही आराम मिळतो.
============
हे ही वाचा :
Post Workout Tips : वर्कआउटनंतर मसल्स पेन होत असल्यास काय करावे?
Curry Leaves : कढीपत्ता खाण्याचे चमत्कारिक फायदे
=============
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
पाळीच्या काळात संप्रेरकांमुळे मूड स्विंग्स, चिडचिड, चिंता यांसारखे मानसिक बदल होऊ शकतात. या काळात मानसिक शांततेसाठी ध्यान, श्वसनसाधना (प्राणायाम) करणे उपयोगी ठरते. प्रिय व्यक्तींशी संवाद साधल्याने भावनिक आधार मिळतो. ‘पीरियड्स’ ही लज्जेची गोष्ट नसून ती शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे स्वतःला समजावून सांगणे महत्त्वाचे आहे.(Health Care Tips)
आरोग्यविषयक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
जर अत्याधिक रक्तस्राव, असह्य वेदना, अनियमित पाळी किंवा दुर्गंध येणारे स्त्राव सतत होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान आणि उपचार हे दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.(Health Tips)