Health Care Tips : वजन कमी करायचे असल्यास तुम्ही पनीर एवजी टोफूचा समावेश डाएटमध्ये करू शकता. कारण पनीरच्या तुलनेत टोफूमध्ये फॅट कमी असतात. अशातच टोफूपासून अनेक पदार्थ तयार केले जाऊ शकतात. याशिवाय बहुतांशजणांच्या मनात असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, आरोग्यासाठी पनीर की टोफू फायदेशीर आहे. खरंतर दोन्ही गोष्टींमध्ये पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. पण यापैकी एकाची निवड करायची झाल्यास तुम्ही काय निवडाल? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
पोषण तत्त्वे
पनीर गाय किंवा म्हशीच्या फाटलेल्या दूधापासून तयार केले जाते. पण टोफू बनवण्यासाठी सोया मिल्कचा वापर केला जातो. पनीर की टोफू आरोग्यासाठी कोणता पर्याय उत्तम आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…..
पनीर आणि टोफूमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. टोफूमध्ये पनीरच्या तुलनेत अधिक लोहाचे प्रमाण असते. अशातच ज्या लोकांच्या शरिरात लोहाचे प्रमाण कमी असते त्यांनी टोफूचे सेवन करावे.
-प्रोटीन
शाकाहारी व्यक्ती आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळवण्यासाठी पनीर खातात. खरंतर पनीर म्हैस किंवा गायीच्या दूधापासून तयार केले जाते. पण टोफूमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. तुम्ही जिमला जात असाल आणि मसल्स गेनसाठी तुम्ही पनीरचे सेवन करू शकता.
-हेल्दी फॅट्स
वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये पनीरएवजी टोफूचा वापर करू शकता. पनीच्या तुलनेत टोफूमध्ये फॅट्स कमी असतात. अशातच तुम्ही टोफूच्या काही डिशेज तयार करू शकता. (Health Care Tips )
-कॅलरीज
कॅलरीजबद्दल बोलायचे झाल्यास पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याच कारणास्तव तो हेल्दी मानला जातो. पण खरं असे नाहीय. पनीरच्या तुलनेत टोफूमध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही टोफूचे सेवन करू शकता.