Health Care Tips : आजकाल बहुतांशजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन फॉलो करतात. खरंतर इंटरमिटेंट फास्टिंग ते किटो डाएट प्लॅन वजन कमी करण्यासाठी उत्तम मानले जाते. यापैकीच डाएट प्लॅन म्हणजे मोनो डाएट. यामध्ये व्यक्ती एका अनिश्चित वेळासाठी एक प्रकारचेच फूडचे सेवन करतो. हे फूड केळ अथवा बटाटा यापैकीच एकाचेच सेवन करू शकतो. याच डाएटला मोनो डाएट असे सध्या म्हटले जात आहे.
मोनो डाएट वजन कमी करण्यासाठी उत्तम मानले जाते. खरंतर, पचनासाठी या डाएटची मदत घेतली जाऊ शकते. याशिवाय एकाच प्रकारचे फूड खाल्ल्याने कॅलरीजचा इनटेक अत्यंत कमी होतो. यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. पण याचे काही नुकसानही आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शरिरात आवश्यक पोषण तत्त्वांची कमतरता निर्माण होणे
दीर्घकाळापर्यंत मोनो डाएट फॉलो करण्याचे मोठे नुकसान असे की, यामुळे शरिरात आवश्यक पोषण तत्त्व कमी होतात. तुम्ही एकाच प्रकारचे भोजन करता यामुळे त्यामधीलच पोषण तत्त्वे शरिराला मिळतात. अन्य पोषण तत्त्वे शरिराला मिळत नाही. यामुळे शरिराची काम करण्याची क्रिया मंदावली जाऊ शकते.
पचनासंबंधित समस्यांचा सामना
मोनो डाएट करणाऱ्यांना काही वेळेस पचनासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये असे फूड निवडले जाते ज्यामध्ये अधिक अथवा कमी फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
मेटाबॉलिज्म मंदावणे
वेगाने वजन कमी करण्यासाठी मोनो डाएटचा काहीजण आधार घेतात. यामुळे मेटाबॉलिज्म मंदावला जाऊ शकतो. खरंतर, हा डाएट प्लॅन फॉलो करताना दीर्घकाळापर्यंत आपल्या कॅलरीज कमी कराव्या लागतात. यामुळेच मेटाबॉलिज्म स्लो होते. यामुळे वजन कमी करणेही काहीवेळेस कठीण होते. एवढेच नव्हे सामान्य डाएट फॉलो करू लागल्यानंतर वेगाने वजन वाढण्यास सुरुवात होते.