Home » मानसिक तणावामुळेही होतो मधुमेह, असा करा बचाव

मानसिक तणावामुळेही होतो मधुमेह, असा करा बचाव

बहुतांशजण तणावाखाली राहतात. याचा परिणामी आरोग्यावर परिणाम होते. यापैकी मोठा आजार म्हणजे मधुमेह. मानसिक तणावामुळे मधुमेह उद्भवू शकतो. जाणून घेऊया यापासून बचाव करण्याचे काही पर्याय सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Mental stress
Share

Health Care Tips : आजकालच्या तणावपूर्ण वातावरणात मानसिक तणावाच्या स्थितीचा सामना करणे सर्वसामान्य बाब झाली आहे. एखाद्याला अभ्यासाचे, कामाचे अथवा आर्थिक समस्येमुळे मानसिक तणावाखाली गेल्यासारखे वाटते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्रस्त असतात. पण तुम्हाला माहितेय का, स्ट्रेस आपल्या अर्ध्यापेक्षा अधिक आजारांचे एक कारण आहे. जाणकार असे म्हणतात की, एखाद्या आजाराची सुरुवात स्ट्रेसच्या कारणास्तव होते. असाच एक गंभीर आजार म्हणजे मधुमेह.

खरंतर, एक्सपर्ट्स म्हणतात की स्ट्रेस आणि मधुमेहाचा सखोल संबंध आहे. तणावामुळे शरिरात कोर्टिसोल नावाचा हार्मोन रिलीज होतो. यामुळे शरिरातील ग्लुकोजचा स्तर वाढला जातो. हेच कारण आहे की, तणावामुळे मधुमेह वाढतो. ज्यावेळी तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीर त्या स्ट्रेसच्या प्रति संवेदनशील होते.

जुने आजार ट्रिगर होतात
तणावामुळे नव्या आजारांसह शरिरातील जुने आजारही सातत्याने ट्रिगर होत राहतात. हेच आजार बरे होण्यासाठी समस्या आणि दीर्घकाळ लागतो. तणावाचा शारिरासह मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे हेल्दी राहण्यासाठी स्ट्रेस मॅनेज करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तणावाची लक्षणे ओखळे महत्वाचे आहे.

तणावाची लक्षणे
-डोकेदुखी
-स्नायू दुखणे
-पुरेशा प्रमाणात झोप न घेणे
-प्रत्येकवेळी आजारी वाटणे
-थकवा
-अधिक किंवा कमी भूक लागणे
-प्रत्येकवेळी बैचेन वाटणे
-नेहमीच डिप्रेशन वाटणे
-अत्याधिक दारु किंवा धुम्रपान करणे (Health Care Tips)

तणावापासून कसे दूर रहाल?
एखाद्या आजारापासून दूर राहण्यासाठी त्याचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय करणे अत्यावश्यक आहे. तणावामुळे काही कामांवर परिणाम होत असल्यास त्याचे मॅनेजमेंट करणे महत्वाचे आहे.
-दररोज व्यायाम करा
-योग किंवा मेडिटेशन करा
-जवळच्या व्यक्तीशी बोला
-कॅफेनचे कमी सेवन करा
-आवडीचे म्युझिक किंवा पुस्तक वाचा


आणखी वाचा :
प्रवासावेळी ट्रॅव्हल एंग्जायटीचा सामना करता? लक्षात ठेवा या गोष्टी
प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी या 5 गोष्टींची घ्यावी खास काळजी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.