Health Care Tips : स्वत:ला हेल्दी ठेवण्यसाठी बहुतांशजण वर्कआउट, योगाभ्यास करणे पसंत करतात. एक्सरसाइज केल्याने तुम्ही अधिक अॅक्टिव्ह आणि फिट राहता. पण काहीवेळेस असे होते की, वर्कआउट केल्यानंतर पोटात ब्लोटिंगची समस्या उद्भवली जाते. यावर उपाय करण्यासाठी वेगवेगळा सल्ला दिला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, वर्कआउटनंतर ब्लोटिंगची समस्या का उद्भवते. यामागे काही कारणे असू शकतात.
वर्कआउटनंतर मसल्सचे दुखणे किंवा हृदयाचे ठोके वेगाने होणे सामान्य बाब आहे. पण पोट जड वाटणे, ब्लोटिंग किंवा गॅसची तक्रार होणे ही बाब काहीवेळेस सामान्य असू शकत नाही. तर जाणून घेऊया वर्कआउटनंतर ब्लोटिंगची तक्रार का उद्भवली जाते याबद्दल सविस्तर…
अत्याधिक हवा गिळणे
वर्कआउटनंतर ब्लोटिंग होण्यामागील कारण म्हणजे अत्याधिक हवा गिळणे असू शकते. खरंतर, ज्यावेळी वर्कआउट करता तेव्हा जोरात श्वास घेतला जातो. खासकरुन कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना अत्याधिक हवा गिळली जाते. यामुळे ती हवा पोटात राहिली जाऊ शकते. अशातच पोटात गॅस, पोटफुगी किंवा पोट जड होणे अशा समस्या होऊ शकतात. वर्कआउट करताना वेगाने धावणे किंवा हाय इंटेसिंटी इंटरवल ट्रेनिंग करतानाही अत्याधिक हवा पोटात जाऊ शकते.
वर्कआउटपूर्वी खाणे किंवा पाणी पिणे
वर्कआउपूर्वी पोटभरेपर्यंत खाणे किंवा अत्याधिक पाणी पिणे, यामुळे वर्कआउटनंतर ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते. खरंतर, वर्कआउटपूर्वी काही खाणेपिणे योग्य नाही. ते पचले देखील जात नाही. यामुळे खाण्याच्या दीड ते दोन तासानंतर वर्कआउट करू शकता.
==================================================================================================
हेही वाचा :
Juice : लोकप्रिय ABC ज्यूस म्हणजे काय? या ज्यूसचे फायदे कोणते?
वेलीचीचे पाणी पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
====================================================================================================
कोर एक्सरसाइज करणे
क्रेंचेज, प्लँक किंवा हेव्ही वजन उचलण्यासारखे कोर वर्कआउट केल्याने पोटातील स्नायूंवर दबाव पडला जातो. यामुळे पचनक्रिया मंदावली जाऊ शकते. अशातच पोट फुगल्यासारखे वाटते. एवढेच नव्हे वर्कआउट करताना रक्त मसल्सच्या दिशेने वळले जाते आणि पचनक्रियेजवळ कमी जाते. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ कमी पचले जातात आणि ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.(Health Care Tips)
शरीरात पाण्याची कमतरता
वर्कआउटवेळी अत्याधिक प्रमाणात घाम निघतो. यामुळे पाण्यासह महत्वाचे मिनिरल्स जसे की, सोडियम आणि पोटॅशियम घामावाटे निघूनत जातात. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स बिघडू शकतो. अशातच हाइड्रेट राहण्यासाठी पाणी प्यावे. वर्कआउटवेळी एकदाच खूप पाणी पिण्याएवजी थोडे थोडे करुन प्या.