बटाट्यापासून आपण विविध पदार्थ तयार करतो. बटाट्याची भाजी ते फ्रेंच फ्राइज सारखे पदार्थ बनवले जातात. पण तुम्हाला माहितेय का, उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने आरोग्याला नुकसान होते. खरंतर उकडलेले बटाटे त्याच दिवशी खावेत असा सल्ला आरोग्य तज्ञांकडून दिला जातो. याशिवाय उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्यास यामध्ये आढळणारे स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. (Health Care Tips)
बहुतांश लोक आधीच बटाटे उकडवतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. याशिवाय उकडलेले बटाटे फ्रिजमधून काढून तळल्यास त्याचे अॅमिनो अॅसिडमध्ये रूपांतर होते.
कच्चे बटाटे फ्रिजमध्ये ठेवणे टाळा
फ्रिजमध्ये उकडलेले बटाटेच नव्हे तर कच्चे बटाटे ठेवू नये. यामुळे बटाटे खराब होऊ शकतात. फ्रिजमध्ये उकडलेले बटाटे ठेवल्यानंतर त्यात असलेली साखर अॅमिनो अॅसिड हे अॅस्परॅगिन कंपाउंडसोबत मिळून एक्राईलामाइड रसायन तयार करते. या केमिकलचा वापर पेपर आणि प्लास्टिक तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे तुम्हाला फ्रिजमध्ये ठेवलेले बटाटे खाण्याची सवय असल्यास ती मोडा.
कसे स्टोअर करावेत बटाटे?
बटाटे स्टोअर करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. बटाटे दीर्घकाळ सुरक्षित ठेवायचे असल्यास ते सूर्यप्रकाशात ठेवू नये. याशिवाय ते एकमेकांवर ठेवू नका.यामुळे बटाटे खराब होऊ शकतात. तज्ञांच्या मते, बटाटे कमीत कमी 50F म्हणजेच 10 डिग्री सेल्सियस तापमानावर स्टोअर करू शकता. फ्रिजमध्ये ठेवलेल्या बटाट्यांमुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. यासाठी तुम्ही देखील उकडलेले बटाटे त्याच दिवशी न खाता दुसऱ्या दिवशी खात असल्यास ही सवय मोडा.
बटाटे खाल्ल्याने होणारे नुकसान
-गॅसची समस्या
बटाटे खाल्ल्याने गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. गॅसच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी उकडलेले बटाटे किंवा बटाट्याचे पदार्थ अति प्रमाणात खाणे टाळावेत. दररोज बटाटा खाल्ल्याने फॅट वाढले जाते.
-लठ्ठपणा वाढतो
बटाटा खाल्ल्याने लठ्ठपणा वाढला जातो. यामुळे वाढलेले वजन कमी करायचे असल्यास बटाटा खाणे सोडून द्या. बटाटा खाल्ल्याने कॅलरीज वाढल्या जातात. (Health Care Tips)
-साखरेचा शरीरातील स्तर
शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी बटाट्याचे सेवन करणे टाळा. बटाट्यामध्ये ग्लाइमेसिक इंडेक्स असतात, ज्यामुळे शरीरातील ग्लुकोजचा स्तर वाढला जातो.
-उच्च रक्तदाब
बटाटा खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. रिसर्चच्या मते, आठवड्यातून चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा उकडलेले, मॅश बटाटे खाऊ नयेत. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढली जाऊ शकते.
हेही वाचा- तुम्हाला लोणचं खाण्याची सवय असेल तर आधी हे वाचा