Health Care Tips : आवळ्याचे दररोज सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. खरंतर आवळ्यात व्हिटॅमिन सी चे प्रमाण अत्याधिक प्रमाणात असते. यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. उपाशी पोटी आवळा खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. आवळयामध्ये व्हिटॅमिन ए, पॉलीफेनोल्स, एल्कलॉइड्स आणि फ्लेवोनाइड्स सारखी पोषण तत्त्वे असतात.
काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, तुम्ही दररोज उपाशी पोटी आवळ्याचे सेवन केल्यास शररीत पांढऱ्या पेशींची संख्या वाढली जाते. ज्या एलर्जी, एखादा संसर्गजन्य आजाराशी लढण्यास मदत करतात. याशिवाय शरिराला येणारी सूजही कमी होते.
यकृताच्या कार्यात सुधारणा होते
आवळ्यामध्ये फाइटोकेमिकल्स जसे क्वेरसेटिन, गॅलिक अॅसिड, कोरिलगिन आणि एलेजिनक अॅसिड असतात, जे शरीराला फ्री रेडिकल्सपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय यकृताच्या कार्यात आवळ्याचे सेवन केल्याने सुधारणा होते.
आतड्यांसाठी फायदेशीर
सकाळी उपाशी पोटी आवळ्याचे सेवन केल्याने गट हेल्थ उत्तम राहते. याशिवाय विषाक्त पदार्थ शरिरातून बाहेर पडण्यास मदत होते. आवळा खाल्ल्याने तुम्ही आयबीएस, बद्धकोष्ठता किंवा अन्य आतड्यासंबंधित समस्यांपासून दूर राहता.
मधुमेहावर नियंत्रण
आवळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर असतो. शरिरातील रक्त शर्कराचा स्तर नियंत्रित करतो. यामध्ये व्हिटॅमिन सी सारखे अँटी ऑक्सिडेंट्स असतात जे मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण मिळवू शकतात. सकाळी उपाशी पोटी आवळा खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. (Health Care Tips)
उच्च रक्तदाबासाठी अत्यंत फायदेशीर
अभ्यासातून समोर आले आहे की, आवळ्याचे नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून तुम्ही दूर राहू शकता. याशिवाय हृदयरोगाच्या समस्येवर कंट्रोल मिळवण्यासाठी आवळा फायदेशीर आहे. आवळ्यात अँटी ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि खनिजे विशेष रुपात असतात. याशिवाय पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असते. जे ब्लड प्रेशरला कंट्रोल करू शकते.