Home » तुम्ही सुद्धा कोल्ड ड्रिंकच्या बॉटेल मध्ये पाणी भरुन ठेवता? तर मग आधी हे जाणून घ्या…

तुम्ही सुद्धा कोल्ड ड्रिंकच्या बॉटेल मध्ये पाणी भरुन ठेवता? तर मग आधी हे जाणून घ्या…

by Team Gajawaja
0 comment
health care tips
Share

भारतीय लोक ही एखादी गोष्ट मिळाली नाही तर कोणता ना कोणता जुगाड करतातच. कोणतेही काम अगदी लवकर किंवा सोप्प्या पद्धतीने करण्यासाठी आपण विविध जुगाड करतो. जसे की, टूटपेस्ट संपली असेल तर ती कापून त्यामधून काढून घेणे, पायपुसणी म्हणून जुने कपडे वापरणे असे काहीसे. आपल्या भारतीयांकडे विविध गोष्टींवर उपाय आहेत. पण आपण बहुतांश वेळा पाहिले असेल की, एखाद्या कोल्डड्रिंक्सच्या बॉटेलमध्ये पाणी भरुन ठेवले जाते. ही गोष्ट जवळजवळ प्रत्येकाच्या घरी होतेच. परंतु असे करणे खरंच आरोग्यासाठी उत्तम आहे का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Health Care Tips)

कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये पाणी
उन्हाळा सुरु झाला की आपण फ्रीजमध्ये थंड पाण्याच्या बॉटल्स किंवा कोल्ड ड्रिंक्स आणून ठेवतो. घरी आलेल्या पाहुण्यांना तर हेच आपण प्रथम विचारतो. फ्रिजमध्ये अशा काही कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटल्स ठेवतो ज्यामध्ये आपण पाणी भरतो. पण असा जुगाड करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. त्यामुळे असे करण्यापासून दूर रहा.

यामुळे होतात हेल्थ संबंधित गंभीर आजार
कोल्ड ड्रिंक असो किंवा मिनरल वॉटरची बॉटल त्यामध्ये तुम्ही खुप दिवस पाणी भरुन ठेवले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. खरंतर या बॉटल्समध्ये दीर्घकाळ पाणी भरुन ठेवल्यास त्यामध्ये Fluoride आणि Arsenic सारखे धोकादायक तत्व तयार होऊ लागतात. यामुळे शरिराचे फार मोठे नुकसान सुद्धा होते. वैज्ञानिकांचे असे मानणे आहे की, शरिरासाठी तो एका स्लो पॉइजन प्रमाणे काम करते.

कॅन्सर होण्याचा धोका
रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी भरुन ठेवल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर सु्द्धा होतो. यामुळेच असे म्हटले जाते की, महागड्या पाण्याच्या बॉटल मधून पाणी प्या. कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जमा झालेले केमिकल हे तुमच्या शरिरावर थेट परिणाम करतात. प्लास्टिकमध्ये असलेले फॅथलेट्स सारखे केमिकल मुत्रपिंडावर गंभीर रुपात परिणाम करतात. त्याचसोबत अधिक काळ पाणी बॉटलमध्ये राहिल्यास बीपीएची समस्या उद्भवू शकते. (Health Care Tips)

हे देखील वाचा- उन्हाळ्यात थंड पाणी पित असाल तर थांबा, आधी हे वाचा

बीपीए हे एक असे केमिकल आहे जे शरिरात लठ्ठपणा, मधुमेह आणि अन्य काही प्रकारच्या आजारांचे कारण ठरु शकते. याला Biphenyl AL असे म्हटले जाते. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवण्यात आलेल्या पाण्यावर सुर्याची किरणे पडल्यास त्यात हळूहळू विष तयार होते. हेच कारण कॅन्सरचा धोका निर्माण करते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.