Health Care Tips : वाढत्या वयासह आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू लागतात. सध्या बिघडलेल्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वयाच्या चाळीशतच आरोग्यासंबंधित काही समस्या सुरू होतात. हृदय ते यकृतापर्यंतच्या समस्या वाढल्या जातात. अशातच शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे असते. जाणून घेऊया वयाट्या चाळीशीत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. जेणेकरुन तुम्ही हेल्दी राहण्यास मदत होईल. एक्सपर्ट्सनुसार, उत्तम लाइफस्टाइल आणि नियमित हेल्थ चेकअप वयाच्या चाळीशीमध्ये करुन घ्यावे. खरंतर, वाढत्या वयानुसार हाडं कमकुवत होऊ लागतात. प्रजनन क्षमताही कमी होते. याशिवाय हृदय, किडनी ते यकृतासंबंधित समस्या वाढू लागतात.
![Women Health Care Tips](https://gajawaja.in/wp-content/uploads/2024/03/Women-Health-Care-Tips-.jpg)
Women Health Care Tips
वयाच्या चाळीशीमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
-वयाच्या चाळीशीमध्ये हृदयासंबंधित नियमित चेकअप करावे. जसे की, कोलेस्ट्रॉलची तपासणी किंवा हृदयासंबंधित एखाद्या आजाराचे लक्षण दिसून येत असल्यास एक्सरे काढू शकता.
-या वयात ब्लड प्रेशरची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते.
-हाडांची घनता वाढत्या वयानुसार कमी होऊई लागते. यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढला जातो. यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या शरिरातील स्तराची तपासणी करावी. (Health Care Tips)
=======================================================================================================
हेही वाचा :
Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस
तोंडाला दुर्गंधी येण्यामागे असू शकतात ही कारणे, समस्येपासून अशी करा सुटका
=======================================================================================================
मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी
तणाव आणि चिंतेमुळे वयाच्या चाळीशीमध्ये अधिक त्रास होऊ लागतो. यामुळे दररोज कमीतकमी अर्धा तास हलकी एक्सरसाइज जसे की, वॉकिंग, योगाभ्यास करा. फास्ट फूडचे अत्याधिक सेवन करणे टाळा. ताजी फळ, भाज्या, डाळी आणि कमी वसा असणाऱ्या प्रोटीनचे सेवन अधिक करा. मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या आजारासंबंधित लक्षणे दिसून येत असल्यास वेळीच चाचणी करुन घ्या. याशिवाय डॉक्टरांकडून सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.