Health Care Tips : वयाची पंन्नाशी पूर्ण केल्यानंतर बहुतांशजणांना हेल्दी आणि फिट राहायचे असते. पण प्रत्येकालाच असे करणे शक्य नाही. कारण पंन्नाशीत काही आजार मागे लागतात. दीर्घकाळ हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. अशतच वयाच्या पंन्नाशीत हेल्दी आणि फिट रहायचे असल्यास कोणत्या पाच सवयी फॉलो कराव्यात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
हेल्दी डाएट
दीर्घकाळ हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये न्युट्रिएंट्सयुक्त गोष्टींचा समावेश करावा. यासाठी डाएटमध्ये कडधान्ये, फळ आणि नट्सचा समावेश करा. या फूड्समध्ये काही पोषण तत्त्वे असतात.
शारिरीक हालचाल महत्त्वाची
फिजिकली अॅक्टिव्ह न राहल्यास तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. यामुळे हाडे, स्नायू कमजोर होऊ लागतात. याशिवाय शरिराला व्यवस्थितीत रक्त पुरवठाही होत नाही. एका रिपोर्ट्सनुसार, दीर्घकाळ आयुष्य जगण्यासाटी प्रत्येक दिवशी 10 हजार स्टेप्स चालणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यक्ती जिमिंग, इंटेस वर्कआउट करत नाही त्यांनी फिट राहण्यासाठी चालणे-फिरणे सातत्याने सुरू ठेवावे.
पुरेशा प्रमाणात सूर्यकिरणांच्या संपर्कात रहावे
हेल्थ एक्सपर्ट्स म्हणतात की, संपूर्ण दिवस लॅपटॉप किंवा मोबाइलवर सातत्याने राहण्याऐवजी नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात रहावे. याच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी मिळते. याचा फायदा शरिरातील हाडे, दातांसाठी फार महत्त्वाचे असते. (Health Care Tips)
रेड मीट पासून दूर राहा
शरिराला प्रोटीनची गरज असते. तरीही अत्याधिक प्रमाणात रेड मीटचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सचे प्रमाण अत्याधिक असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी नुकसानदायक असू शकते.
तणावापासून दूर राहा
तणावाचा खासगी आयुष्यात मोठा प्रभाव होऊ शकतो. यामागे काही कारणे असू शकतात. यामध्ये वर्क प्रेशर, परिवार, आर्थिक समस्या, नोकरी जाणे, चिंता अशा सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. अशातच तणावापासून दूर राहण्यासाठी मेटिडेशन आणि योगाभ्यास करावा. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल.