Health Care Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अशा गोष्टींचा वापर करून तुम्ही सहज बेली फॅट कमी करू शकता. आजकाल तुम्ही पाहिले असेल की, सकाळी उठल्यानंतर बहुतांशजण डिटॉक्स वॉटर पितातत. सध्या डिटॉक्स वॉटरचा ट्रेण्ड आहे. अशातच तुम्हाला सकाळी उठल्यानंतर एखादे पेय अथवा चहाएवजी डिटॉक्स वॉटरचे सेवन करू शकता.
काकडीचे डिटॉक्स वॉटर
तुम्हाला बेली फॅट कमी करायचे असल्यास आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही सकाळी डिटॉक्स वॉटरचे सेवन करू शकता. डिटॉक्स वॉटर शरिरातील सर्व टॉक्सिन बाहेर काढते. याशिवाय पचनक्रिया मजबूत होते. काकडीचे डिटॉक्स वॉटर तयार करण्यासाठी एका बॉटेलमध्ये काकडीचे स्लाइस, लिंबूचे स्लाइस आणि पुदीना मिक्स करा. हेच पाणी सकाळी उठल्यानंतर प्या.
अॅप्पल डिटॉक्स वॉटर
अॅप्पल डिटॉक्स वॉटर प्यायल्याने काही समस्यांपासून सुटका होऊ शकते. जर तुम्ही दररोज अॅप्पल डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने शरिर हाइड्रेट राहते. वजनही वेगाने कमी होते. अॅप्पल डिटॉक्स वॉटर तयार करण्यासाठी एका बॉटलमध्ये पाणी टाकून त्यामध्ये अॅप्पलचे स्लाइस कापून टाका. यामध्ये थोडी दालचिनी टाका. हेच पाणी पूर्ण रात्रभर झाकून ठेवा. सकाळी उठून पाणी प्या. यामुळे शरिरातील टॉक्सिन निघून जातील आणि पचनक्रिया मजबूत होईल.
लिंबू-काकडी डिटॉक्स वॉटर
अत्याधिक प्रमाणात तुम्ही गोड पदार्थांचे सेवन करता तर त्याचा शरिरावर परिणाम होतो. याशिवाय मधुमेहाचा धोकाही वाढला जातो. अशातच गरजेचे आहे की, शरिरातील टॉक्सिन निघून जातात. हे डिटॉक्स वॉटर तयार करण्यासाठी रात्रभर एका बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लिंबूचे स्लाइस आणि काकडी कापून टाका. सकाळी हेच पाणी सकाळी उठून प्या. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
आल्याचे डिटॉक्स वॉटर
सकाळी उठल्यानंतर आल्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कार यामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होते. याशिवाय पचनक्रियाही उत्तम राहते. यासाठी तुम्ही आलं पाण्यात उकळवून थोडे थंड करा. यानंतर पाणी गाळून ते प्या. यामुळे बेली फॅट हळूहळू कमी होईल. (Health Care Tips)
पुदीना डिटॉक्स वॉटर
शरिर फ्रेश आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पुदीन्याचे पाणी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया मजबूत होईल. बेलीफॅट कमी करण्यासाठीही पुदीना डिटॉक्स वॉटर पिऊ शकता. पुदिन्याचे पाणी तयार करण्यासाठी संपूर्ण रात्रभर पुदीना पाण्यात ठेवा. यामध्ये लिंबाचे तुकडेही टाका. हेच पाणी सकाळी प्यायल्याने फायदा होईल.