Home » या 4 भाज्या उकडवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

या 4 भाज्या उकडवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

उकडलेल्या भाज्यांची चव लागत नाही. पण अशा भाज्या तुम्हाला फिट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याशिवाय शरिराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे देखील मिळतात.

by Team Gajawaja
0 comment
Share

Health Care : भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन, मिनिरल्स, फायबर, पोटॅशिअम आणि लोहासह काही महत्त्वाची पोषण तत्त्वे तुम्हाला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. एवढेच नव्हे तुम्ही काही आजारांपासून दूर राहता. पण आजकाल बहुतांशजण एखादी भाजी तयार करताना ती अत्याधिक प्रमाणात शिजवतात अथवा तेल अधिक वापरतात.

अशा काही भाज्या आहेत ज्या तेलात तळण्याएवजी उकडवून खाणे उत्तम मानले जाते. खरंतर, काही भाज्या अत्याधिक तेल आणि मसल्यांमध्ये करु नये. यामुळे भाज्यांमधील पोषण तत्त्वे नष्ट होतात. भले उकडवलेल्या भाज्यांची चव नसते. पण तुम्ही यामुळे फिट आणि हेल्दी राहू शकता. जाणून घेऊया कोणत्या भाज्या उकडवून खाल्ल्या पाहिजेत.

ब्रोकली
हिरव्या रंगात येणारी ब्रोकोली तुम्ही उकडवून खाल्ल्याने आरोग्यासंबंधित काही फायदे होतात. यामध्ये काही अँटी-ऑक्सिडेंट्स तत्व असतात, जे शरिरासाठी महत्त्वाचे असतात. ब्रोकली खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. पण ब्रोकोली तळून खाल्ल्यास त्यामधील पोषण तत्त्वे नष्ट होतात.

पालक
लोहयुक्त असणाऱ्या पालकचे ज्यूस अथवा सॅलड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खरंतर हिरव्या भाज्या उकडवून खाल्ल्याने डोळ्यासंबंधित समस्या दूर राहतात. पालकाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढत काही आजारांपासून दूर राहता.

बटाटा
बटाट्याचा वापर प्रत्येक घरात केला जातो. बहुतांश भाज्यांमध्ये बटाटा वापरला जातो. खरंतर बटाटा खाण्याची एक योग्य पद्धत आहे. बटाटा नेहमीच उकडवून खावा. असे केल्याने बटाट्यामधील कॅलरीज कमी होतात. याशिवाय बटाटा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. (Health Care)

बीन्स
बीन्समध्ये अनेक पोषण तत्त्वे असतात. यामध्ये सोडियम, फॉलेट, फायबर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन असे काही पोषण तत्त्वे असतात. बीन्स मधुमेहच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. बीन्स उकडवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. बीन्स खाण्याआधी 10 मिनिटे उकडवावेत. यानंतर बीन्सवर मीठ आणि काळीमिरीची पावडर टाकून खावेत.


आणखी वाचा :
Anti Diet Plan म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर
वयाच्या पंन्नाशीतही हेल्दी आणि फिट रहायचेय? फॉलो करा या 5 सवयी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.