Home » पोटाला सूज येण्यामागे तुमच्या ‘या’ सवयी तर कारणीभूत नाहीत ना?

पोटाला सूज येण्यामागे तुमच्या ‘या’ सवयी तर कारणीभूत नाहीत ना?

तुम्हाला पोट फुगीची समस्या गेल्या काही दिवसांपासून जाणवतेय का? अथवा पोटाला जरा जरी हात लावल्यानंतर दुखते? खरंतर पोट फुगीची समस्या तुम्हाला काही संकेत देतात.

by Team Gajawaja
0 comment
Health Care During Holi
Share

Health Care : तुम्हाला पोट फुगीची समस्या गेल्या काही दिवसांपासून जाणवतेय का? अथवा पोटाला जरा जरी हात लावल्यानंतर दुखते? खरंतर पोट फुगीची समस्या तुम्हाला काही संकेत देतात. पोटाला सूज येण्याच्या समस्येला गेस्ट्राइटिस असे म्हटले जाते. याची काहीवेळेस लक्षणे दिसून येत नाहीत. याशिवाय काहींमध्ये याची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांचे पोटाच्या वरील भागात बैचेन झाल्यासारखे वाटणे किंवा दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे बसल्याबसल्यानंतरही पोट दुखते. जर तुम्ही देखील अशा समस्यांचा सामना करताय तर यामागे तुमच्या काही सवयी असू शकतात. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…..

दीर्घकाळ उपाशी राहणे
दीर्घकाळ उपाशी राहिल्याने पोटाला सूज येण्याची समस्या वाढली जाऊ शकते. खरंतर, काहीजण वेगवेगळ्या कारणास्तंव फूड खाणे टाळतात. अशातच याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ उपाशी राहण्याची सवय तुम्हाला आजारी पाडू शकते.

मैद्याचे अधिक सेवन
मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे अत्याधिक सेवन केल्यास पोट आणि आतड्यांना सूज येऊ शकते. खरंतर, मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण अत्यंत कमी असते. मैदा तुमच्या शरिराला डिटॉक्स करण्यास मदत करत नाही. याशिवाय मैद्यामुळे पचनक्रिया बिघडली जाते.

पाकिट बंद पदार्थ
आजकाल मार्केटमध्ये पाकिट बंद पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात. अशाप्रकारेच फूड खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. एवढेच नव्हे, पाकिट बंद पदार्थांमुळे पोटाला भयंकर सूज येऊ शकते. खरंतर अशाप्रकारच्या फूडमध्ये सोडिअमचे प्रमाण सर्वाधिक असते. जे खाल्ल्याने पोटाला सूज येऊ शकते. (Health Care)

रात्री उशिरा जेवण करणे
रात्री उशिरा जेवण केल्याने पचनक्रिया बिघडली जाते. खरंतर, रात्री उशिरा केलेले जेवण व्यवस्थितीत पचले जात नाही. यामुळे पोट फुगलेले आणि जड वाटते. या व्यतिरिक्त अन्न व्यवस्थितीत पचल्यास अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही उद्भवू शकते.

सोडा
बहुतांशजणांना कार्बोनेटेड ड्रिंक पिण्याची सवय असते. यामुळे पोटाच्या समस्या वाढल्या जाऊ शकतात. अशातच सोड्याचे अत्याधिक सेवन केल्याने पोटात गॅस तयार होतो आणि पोट फुगणे, अपचन होणे, अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकतात.

(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
महिलांनी प्रत्येक तीन महिन्यांनी ‘या’ वैद्यकीय चाचण्या जरुर कराव्यात
पाठ दुखीच्या समस्येने त्रस्त आहात? करा हे घरगुती उपाय
‘या’ कारणास्तव वर्कआउटनंतर होऊ शकतो Muscle Pain

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.