Home » तुम्हाला लोणचं खाण्याची सवय असेल तर आधी हे वाचा

तुम्हाला लोणचं खाण्याची सवय असेल तर आधी हे वाचा

लोणच्याचं नाव काढल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. लोणची विविध प्रकारची येतात. जसे की, लिंबू, आंबा, आवळा, कोबी, गाजर इत्यादी. जेवणाच्या ताटात लोणच्याचा समावेश असेल तर आवडीने जेवण खाल्ले जाते.

by Team Gajawaja
0 comment
health tips
Share

लोणच्याचं नाव काढल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. लोणची विविध प्रकारची येतात. जसे की, लिंबू, आंबा, आवळा, कोबी, गाजर इत्यादी. जेवणाच्या ताटात लोणच्याचा समावेश असेल तर आवडीने जेवण खाल्ले जाते. पण आंबट, तुरट लागणारे लोणचे  खाण्याचे जसे फायदे आहेत. तसेच अधिक प्रमाणात खाल्ल्याने देखील तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते अधिक लोणचं खाण्याची सवय तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. (Health Care Tips)

सकाळच्या नाश्त्यात पराठ्यांसोबत लोणच, लंच किंवा डिनरमध्ये लोणचं खाण्याची सवय योग्य नव्हे. काही लोक भाजी सारखं लोणचं ताटात वाढून घेतात. पण असे करणे चुकीचे आहे. डॉक्टर्स असे म्हणतात की, अधिक लोणचं खाण्याच्या सवयीमुळे आजारी पडू शकता. अधिक लोणचं खाल्ल्याने आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते याच बद्दल जाणून घेऊयात अधिक.

-सोडियमचे अधिक प्रमाण
लोणचं किंवा यासारख्या आंबट पदार्थांमध्ये हाय सोडियम नैसर्गिक क्रियेच्या माध्यमातून ब्लड प्रेशर वाढवते. अधिक लोणचं खाल्ल्याने एक्स्ट्रा सोडियम क्लोराइडचे प्रमाण वाढले जाते. यामुळे हाय ब्लड प्रेशरसह दुसरे क्रोनिक आजार होऊ शकतात.

Eating pickle or homemade achaar has many health benefits | HealthShots

-किडनीवर परिणाम
एक रेग्युलर मीडियम साइज लोणच्यामध्ये जवळजवळ ५६९ मिलीग्रॅम सोडियम असते. आपल्या शरीराला दररोज २३०० मिलीग्रॅमची गरज असते. लोणच्यामध्ये मीठाचे प्रमाण अधिक असल्यास डाएटसह सोडियमचे प्रमाण अधिक वाढले जाते. याच कारणास्तव वॉटर रिटेंशन, पोट सुजणे, हाय ब्लड प्रेशर आणि किडनीवर परिणाम होतो. ज्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते ते कॅल्शिअमचे अवशोषण कमी करतात. यामुळे हाडं कमकुवत होतात. (Health  Care Tips)

हाय कोलेस्ट्रॉल
लोणचं तयार करताना तेलाचा अधिक वापर केला जातो. तेलामुळे कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढला जातो. सतत लोणचं खाल्ल्याने हृदय रोगासंबंधित धोका वाढला जातो. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयच नव्हे तर यकृताला देखील नुकसान पोहचू शकते. लोणच्याच्या तेलात ट्रांस फॅट असतात. जे एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे लोणचं खात असल्यास ते मर्यादेत खावे.

या व्यतिरिक्त लोणचं दररोज खाल्ल्याने अल्सरची समस्या वाढू शकते. यामागील कारण म्हणजे व्हिनेगरचा वापर करणे. व्हिनेगरमुळे देखील अल्सर वाढला जाऊ शकतो. लोणच्याच्या सततच्या सेवनामुळे पोटात अम्लीयता वाढली जाते. त्याचसोबत अॅसिडिटी, गॅस, आंबट ढेकर येणे सारख्या समस्या होऊ शकतात.


हेही वाचा- सणासुदीला गोड पदार्थ खाऊनही बर्न करू शकता कॅलरी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.