Health Care : बहुतांशजणांना रात्रीचे जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. काहीही केल्या तरीही ही सवय सुटत नाही. यावेळी आइस्क्रिम, चॉकलेट अथवा एखादा स्वीट पदार्थ आवर्जुन खाल्ला जातो. या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अत्याधिक असल्याचे माहिती असूनही लोक याचे सेवन करतात. पण अत्याधिक प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढणे ते उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….
वजन वाढणे
साखरयुक्त पेय, पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. वेबमेडच्या रिपोर्ट्सनुसार, तुम्ही जेवढ्या अधिक प्रमाणात साखरेचे सेवन करता तेवढेच तुमचे वजन वाढले जाते. ऐवढेच नव्हे यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोकाही वाढला जातो. खरंतर अधिक साखरयुक्त पदार्थांमुळे शरिराचे नुकसान होते.
सेक्शुअल हेल्थ
रिपोर्ट्सनुसार, साखरेमुळे आपले सर्कुलेटरी सिस्टिम प्रभावित होते. हे सिस्टिम आपल्या शरीरातील रक्ताचा फ्लो कंट्रोल करतात. पण तुम्ही अत्याधिक प्रमाणात गोड खाल्ल्यास याचा तुमच्या सेक्शुअल हेल्थवर परिणाम होऊ शकतो.
हृदयाशी संबंधित आजार
एक्सपर्ट्स म्हणतात की, तुम्ही सातत्याने गोड पदार्थ खाल्ल्यास याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. अधिक गोड पदार्थ किंवा पेयांमुळे वजन वाढतेच. पण हृदयासंबंधित आजारही निर्माण होतात. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी दररोज गोड पदार्थ खाण्याची सवय टाळा.
फॅटी लिव्हर
असे मानले जाते की, अधिक गोड दररोज खाल्ल्याने यकृताला नुकसान पोहोचू शकते. काही प्रकरणात फॅटी लिव्हरच्या समस्येचा सामनाही करावा लागू शकतो. गोड खाण्याच्या नादात काही गंभीर आजारही होऊ शकतात. (Health Care)
उपाय काय?
तुम्ही अत्याधिक प्रमाणात गोड खात असल्यास तुम्हाला अनहेल्दी वाटू शकते. यामुळे डेली रूटीनमध्ये डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करावा. यामुळे पोट दुखी, छातीत जळजळ अथवा अन्य समस्यांपासून तुम्ही दूर रहाल.
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)