आजकाल धावपळीच्या जगात तणाल ही एक सर्वसामान्य समस्या झाली आहे. तणाव हा कोणत्याही कारणाने येऊ शकतो. कामाचे प्रेशर असो किंवा घरातील एखादा प्रॉब्लेम. याचाच परिणाम आपल्या मेंदूसह आरोग्यावर ही होतो. परंतु तणावाचे व्यवस्थापन करण्याच्या काही पद्धती आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जेवण. जेवण केवळ पोषणाचा एकमेव स्रोत नसून ते आपल्या मूड आणि भावनात्मक स्थितीला प्रभावित करते. चुकीच्या पद्धतीने काही गोष्टींचे सेवन केल्याने तणाव आणि चिंता अधिक वाढू शकते. जेव्हा तुम्ही हेल्दी फूड खाता तेव्हा तणाव कमी होतो आणि तुम्ही उत्साहित राहता. त्यामुळे तणावाखाली असाल तर कधीच पुढील पदार्थांचे सेवन करु नका. (Health Care)
दारु
काही लोक रिलॅक्स होण्यासाठी दारुचे सेवन करतात. परंचु वास्तविकरित्या यामुळे तणावाचा स्तर अधिक वाढू शकतो. दारु एक असा पर्याय आहे जो आपला मूड नियंत्रित करणाऱ्या न्युरोट्रांसमीर सेरोटोनिनच्या उत्पादनात हस्तक्षेप करतो. जेव्हा सेरोटोनिनचा स्तर कमी होतो तेव्हा चिंता आणि उदासिनता अधिक वाढते. याच्या अतिरिक्त सेवानमुळे झोपेवर परिणाम होतो. अशातच तणाव आणि चिंता वाढू शकते. म्हणूनच तणावाखाली असाल तर दारु पिण्यापासून दूर रहा.
साखर
जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरिरातून हार्मोन कोर्टिसोल सोडतो. जो ब्लड शुगरचा स्तर वाढवो. गोड खाद्यपदार्थ आणि पेयांचे सेवन केल्याने ब्लड शुगरचा स्तर अधिक वाढू शकतो. ज्यामुळे उर्जेचा स्तर हा कमी होतो आणि तणाव वाढू शकतो. तणावावेळी तुम्ही अधिक गोड पदार्थ खाण्यापासून दूरच राहिले पाहिजे. (Health Care)
प्रोसेस्ड फूड आणि हाय फॅट पदार्थ
प्रोसेस्ड फूड मध्ये वसा आणि कॅलरी अधिक प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते. यामुळे हृदयरोग आणि मधुमेहासारख्या समस्या वाढू शकतात. या व्यतिरिक्त उच्च वसा असणारे खाद्यपदार्थ सेरोटोनिनिच्या उत्पादनात हस्तक्षेप करतात. त्यामुळे तणावाची लक्षण बिघडू शकतात. तणावावेळी प्रोसेस्ड फूड किंवा हाय फॅट असणारे फूड्स खाणे टाळा.
हेही वाचा- उन्हाळ्यात उसाचा रस पित असाल तर आधी ‘हे’ वाचा
कॅफेन
कॅफेन एक उत्तेजक पदार्थ आहे. जे आपल्यााल कॉफी, चहा, चॉकलेटमध्ये मिळते. याच्या अधिक सेवनाने हृदयाची गति आणि रक्तदाब वाढू शकतो. अशातच तणावाची शारिरीक लक्षणं जसे की, घाम आणि थरथरल्यासारखे वाटणे अधिक वाढू शकते. कॅफनच्या सेवनाने झोपेवर परिणाम होतो. यामुळे ही तणाव वाढू शकतो. जर तु्म्ही तणावाखाली असाल तर कॅफेनच्या सेवनापासून दूर रहावे.