भारतात बहुतांश घरामध्ये चहासोबत काहीना काही खाल्ले जाते. घरात पाहुणे आले किंवा एखादे फंक्शन असेल तर चहा हमखास दिला जातो. चहा पिण्याचे फायदे सुद्धा आहेत. मात्र याचे नुकसान ही आहेत. हेच कारण आहे की, चहा हेल्दी बनवण्यासाठी बहुतांश लोक चहासोबत ड्राय फ्रुट्स आणि नट्स खातात. त्यांना असे वाटते की, असे केल्याने शरीराला फायदा होईल. परंतु अशी चूक कधीच करू नका. (Health Care)
तुम्हाला जाणून हैराण होईल की चहासोबत ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने चहामधील खराब गोष्टी तुमच्या शरीरात जातात.त्याचसोबत ड्रायफ्रुट्सचे न्युट्रिएंट्स ही शरीरात गेल्याने अधिक समस्या उद्भवू शकते. चहा सोबत ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने त्यामधील पोषक तत्त्वे शरीरात पोहचत नाही. उलट काही आजारांना आमंत्रण दिले जाते.
चहा सोबत ड्राय फ्रुट्स का खाऊ नयेत?
हेल्थ एक्सपर्ट्स असे म्हणतात की, चहात टॅनिन सर्वाधिक प्रमाणात असते. याचे प्रमुख काम आहे की, लोहाचे प्रमाण शरिरापर्यंत पोहचवण्यास रोखणे. तर बहुतांश नट्स किंवा ड्रायफ्रुट्स लोहयुक्त असतात. बादामात खासकरून खुप लोह असते. तर आपल्या शरीराला लोहाची अत्यंत गरज असते. कारण शरीराला पुरेसे रक्त लोहाच्या माध्यमातून मिळते. अशातच एखादा व्यक्ती चहासोबत बदाम किंवा नट्सखात असाल तर शरिराला फायदा होणार नाही. सुक्या मेव्यापासून मिळणारे फायदे टॅनिनमुळे रोखले जाते.
तसेच चहासोबत ड्राय फ्रुट्स खाल्ल्याने काही समस्या उद्भवतात. असे केल्याने तुमचे पोट फुगणे किंवा गॅस तयार होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जर खाल्ल्यानंतर लगेच असे झाले नाही तर काही वेळेनंतर यामुळे अॅसिडिटी, भूक न लागणे किंवा पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. (Health Care)
या व्यतिरिक्त शरीरात टॅनिन वाढल्यास आणि लोहाची कमतरता निर्माण झाल्यास शरीराला भविष्यात होणारे आजार उद्भवू शकतात. दीर्घकाळापर्यंत असे केल्याने थकवा, श्वास फुलणे, शरीर किंवा चेहरा पिवळा पडणे, एनिमियाची लक्षणे दिसून येणे, नखं तुटणे अशा समस्या उद्भवतात. लक्षात ठेवा की, तुमच्याकडे ड्राय फ्रुट्स आणि चहा पिणे असे दोन्ही ऑप्शन आहेत. सर्वात प्रथम ड्राय फ्रुट्स खा. नट्स खाल्ल्यानंतर अर्धा तासांनी किंवा एका तासाने तुम्ही चहा पिऊ शकता. असे केल्याने शरीराला दोन्ही गोष्टींचा फायदा होतो.
हेही वाचा- Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !