खोकला ही एक सामान्य तक्रार आहे, जी बाराही महीने लोकांमध्ये पाहायला मिळते. मात्र थंडीच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. खोकला झाला की, आपण सर्वात आधी काय करतो तर जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जातो आणि त्यावर उपचार करतो. आजच्या लेखात आपण याच खोकल्यावर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काही खास माहिती. (Health Care)

बऱ्याचदा काय होत तर एखाद्याचा खोकला खुप दिवस राहिला किंवा सुका खोकला खुप झाला तर बरेच लोक त्याला टीबी म्हणजेच क्षयरोगाचा खोकला समजतात आणि घाबरतात.टीबी एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग सहसा आपल्या फुफ्फुसावर हल्ला करतो. आणि हे आपल्या मेंदू आणि मणक्यापर्यंत त्याबरोबरच शरीराच्या इतर भागांमध्ये ही पसरु शकते. आणि याला मायक्रोबॅक्टेरियम आणि ट्यूबरक्युलोसिस नावाचा एक प्रकारचा जीवाणू कारणीभूत ठरतो. जगातील सर्वात घातक आणि मोठ्या आजारांमध्ये टीबी म्हणजेच क्षयरोगाला सामील केले गेलेले आहे. त्यामुळे सामान्य खोकला आणि टीबी चा खोकला नेमका कसा ओळखावा? त्याची लक्षण काय असतात? याच महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.
सामान्य खोकला आणि टीबी खोकला यामधील फरक :
– टीबी म्हणजेच क्षयरोगा कफ आणि त्याबरोबर खोकला ही प्रमुख लक्षणे आहेत. जर एखाद्याला ७-८ दिवसांपेक्षा जास्त खोकला असेल आणि उपचार घेऊनही त्याच्यात फरक पडत नसेल तर तो टीबी चा खोकला असू शकतो. त्यामुळे एक आठवड्यापेक्षा कफ आणि खोकला राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. (Health Care)
– बऱ्याचदा आपण ऐकल असेल की, काही जणांच्या खोकल्यातुन रक्तस्त्राव होतो. हे क्षयरोगातील खुप मोठ आणि महत्वाचे लक्षण मानले जाते.
– जर एखाद्या व्यक्तीला सकाळी झोपेतून उठलं की, सतत खोकला आणि त्याबरोबर कफ बाहेर पडत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. खास करुन ही समस्या जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस सुरु राहिली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
– खोकला आणि कफ सुरु झाल्यास त्या व्यक्तीला वारंवार ताप येणे, थंडी वाजणे असा त्रास होत असेल तर हे सुद्धा क्षयरोगाचे लक्षण असू शकते.
– खुप दिवसांच्या खोकल्याबरोबरच खोकताना फुफ्फुसात वेदना जाणवणे किंवा घशात दुखणे ही लक्षणे सुद्धा क्षयरोगाची समजली जातात.
========
हे देखील वाचा: वयाच्या २१ वर्षानंतर महिलांनी जरुर केली पाहिजे ‘ही’ चाचणी, कॅन्सरच्या धोक्यापासून रहाल दूर
========
– खुप दिवस कफ आणि खोकल्यामुळे त्या व्यक्तीची भूक कमी होणे, त्याच वजन झपाट्याने कमी होणे अशी लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
कोणत्याही आजाराच्या सुरवातीला घाबरून न जाता आपण वेळेवर डॉक्टरांकडे गेलो आणि त्यावर योग्य ते उपचार घेतले तर त्यातून टी व्यक्ती सुखरूप बरी होऊ शकते.त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
( डिस्क्लेमर : वर दिलेली माहिती खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. हा लेख माहितीच्या आधारावर लिहिला गेलेला आहे.)