Health care in pregnancy-गर्भवती महिलेवर एक मोठी जबाबदारी असते. कारण आपल्या बाळाला योग्य पोषण आणि त्याची पूर्णपणे वाढ करणे आईच्या हातात असते. अशातच थोडा व्यायाम आणि योग्य खाण्यापिण्याची सवय असेल तर गर्भवती महिला या आपल्या प्रेग्नेंसीमध्ये आनंद घेता येईल. गर्भाव्यस्थेदरम्यान बहुतांश महिलांना काय खाल्ले पाहिजे आणि काय खाऊ नये असे प्रश्न त्यांना पडतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखातून प्रेग्नेंन्सीमध्ये वांग खाणं हे सुरक्षित आहे का याबद्दलच अधिक माहिती देणार आहोत. काही संशोधनात असे ही म्हटले की, गरम खाद्यपदार्थ्यांच्या सेवन केल्यास गर्भपात ही होऊ शकते. अशा पदार्थांमध्ये वांग्याचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळेच प्रेग्नेंसीमध्ये वांग खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
वांग्यात काही अशी पोषक तत्व आहेत जी गर्भातील शिशु आणि गर्भवती महिलेसाठी फायदेशीर ठरु शकतात. तर जाणून घेऊयात प्रेग्नेंसीमध्ये वांग खाणं हे गर्भवती महिलेस बाळासााठी किती लाभदायक ठरते. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की, प्रेग्नेंसीवेळी वांग खाणं आणि त्याच्या फायद्यासंदर्भात अधिक वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाहीत.

-रक्तातील साखर सामान्य स्तरावर ठेवण्यास मदत होते
रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य ठेवण्यासाठी वांग मदत करते. त्यामुळे ज्या गर्भवती महिलांना मधुमेहाची समस्या आहे त्या याचे सेवन करु शकतात. वांग हे एक कमी कॅलरी असणारी भाजी आहे. कमी कॅलरीचा आहार मधुमेहाचा धोका कमी करु शकतो. १०० ग्रॅम वांग्यात फक्त २५ कॅलरी असतात.
हे देखील वाचा- कंटोला भाजी तुम्हाला आवडते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
-उच्च रक्तदाब असेल तर होईल फायदा
वांग्यात एक तत्व असते त्याला कोलीन एस्टर असे म्हटले जाते. यामध्ये अँन्टीहापरटेंसिव गुण असतात. उंदरांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये रक्तदाब सामान्य स्तरावर ठेवण्यासाठी हे तत्व फायदेशीर असल्याचे समोर आले. आणखी एका शोदात वांग्याचे सेवन हे हृदय रोग आणि रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करतात. दरम्यान, व्यक्ती आणि गर्भवती महिलेवर याचा काय प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी आणखी संशोधन करण्याची गरज आहे.(Health care in pregnancy-)
-पचनासाठी वांग्याचा उपयोग
गर्भवती महिलांना पाचन आणि कब्जची समस्या होणे ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु वांग्याचे सेवन केल्याने यापासून दिलासा मिळू शकतो. वांग्यात काही प्रमाणात फायबर असतात जे पाचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
दरम्यान, प्रेग्नेंसीमध्ये वांग्याचे सेवन हे संतुलित प्रमाणातच केले पाहिजे. परंतु त्याचे सेवन दररोज करु नये. कारण यामुळे काही नुकसान ही होऊ शकते. त्याचसोबत वांग तळून किंवा भाजून त्याची भाजी तुम्ही खाऊ शकता. मात्र लक्षात ठेवा की, अधिक प्रमाणात वांग खाल्ल्यास त्यामधील फाइटोहार्मोन गर्भपाताचे कारण ठरु शकतात.