नखं खाण्याची सवय ही आपल्याला लहानपणापासूनच लागली जाते. परंतु नखं खाण्याची सवय लागली असेल तर त्यामागे तणाव हे सुद्धा एक कारण असू शकते. कोणतेही कारण असो पण नखं खाणे ही सवय कोणत्याही वयोगटातील मंडळींसाठी नुकसानदायक असते. या व्यतिरिक्त नखं खाल्ल्याने हाताला लागलेली माती किंवा घाण ही आपल्या पोटात जाते. अशातच जर तुम्ही सुद्धा नखं खात असाल तर वेळीच लक्ष द्या अन्यथा तुमचेच नुकसान होणार आहे. या सवयीपासून कशी सुटका मिळवाल त्याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (Health Care)
लोक नखं का खातात?
नखं खाण्यामागे कही कारणं असू शकतात. काही लोकांना कंटाळा आला आहे म्हणून नखं खातात, तर काही जण लक्ष केंद्रित करण्यासाठी. तसेच काहीजण स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी नखं खातात.
घरगुती पद्धतीने कशी सोडवाल ही सवय
-नखं खाण्याची सवय असेल तर लहान नखं ठेवा. अशातच ती तुम्ही तोंडात घालणार नाहीत. तसेच नखं वाढत असतील तर ती वेळोवेळी कापा आणि स्वच्छ सुद्धा ठेवा.
-नखांसाठी मॅनीक्योरचा सुद्धा येथे वापर करु शकता. जेव्हा तुम्हाला तुमची नखं ही सुंदर दिसतील तेव्हा तु्म्ही ती खाण्याचा विचार करणार नाही.
-नखांना नेलपेट लावा. जेणेकरुन आपण आपल्या हाताची बोट तोंडात घालणार नाहीत.
-या व्यतिरिक्त नखं खाण्याची सवय घालवण्यासाठी एखाद्या नेल एक्ससरिजचा वापर करा किंवा बँडेजने कवर करा.
-अधिक नखं खाण्याची सवय असेल तर त्याचा तुमच्या दातावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. या सवयीमुळे आपले दात मूळ स्थानापासून हलण्यास सुरुवात होते.
-या व्यतिरिक्त नखांमध्ये असलेली घाण आणि बॅक्टेरिया पोटात जातात. याचा परिणाम तुमच्या चयापचयावर होऊ शकतो. पोट दुखी होण्याची समस्या अशातच उद्भवते आणि तुम्हाला शौचसाठी सुद्धा समस्या येऊ शकते. (Health Care)
-तसेच नखं खाण्याची सवय ही लगेच जाणारी नाही. मात्र जेव्हा तुम्ही नखं खाता तेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्याचा विचार करा. जसे की, तुम्हाला एखादी आवडणारी गोष्ट, काम करा. यामुळे तुमच्या हाताची बोट तोंडात जाणार नाहीत.
हे देखील वाचा- सावधान ! घोरण्याच्या सवयीवर माऊथ टॅपिंग ट्रेंड
दरम्यान, काही लोकं शरिरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा नखं खातात. मात्र तुमच्यावर अधिक ताण असेल आणि त्यादरम्यान नखं खाण्याची सवय तुम्हाला असे करण्यापासून दूर रहावे लागणार आहे. तुम्ही तुमचे लक्ष एखाद्या दुसऱ्या ठिकाणी वळवू शकता.