Health Care : कोलेस्ट्रॉल हा शब्द ऐकला की बहुतेक लोकांच्या मनात नकारात्मक विचार येतात. परंतु कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात – एचडीएल (HDL) म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल (LDL) म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल. शरीराच्या निरोगी कार्यासाठी एचडीएलचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. हे गुड कोलेस्ट्रॉल रक्तातील जास्तीचे वाईट कोलेस्ट्रॉल साफ करून हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. म्हणूनच, आहारात असे काही पदार्थ सामील करणे गरजेचे आहे ज्यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढेल आणि आपण तंदुरुस्त राहू शकतो.
सुकेमेवे आणि बिया
बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू यांसारखे सुकेमेवे एचडीएल वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जातात. त्यात असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स हृदयासाठी उपयुक्त असतात. याशिवाय जवसाचे बी, चिया सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया हेही गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. दररोज मूठभर सुकेमेवे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहते.
मासे आणि सीफूड
ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सने भरपूर असलेले साल्मन, मॅकरल, टूना किंवा सार्डिन्स हे मासे गुड कोलेस्ट्रॉल वाढवतात. आठवड्यातून दोनदा फिश डायट घेतल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. शाकाहारी लोकांसाठी जवसाचे बी, अक्रोड हे उत्तम पर्याय ठरू शकतात.
फळे आणि भाज्या
ताजी फळे आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. सफरचंद, संत्री, डाळिंब, पेरू ही फळे रक्तातील एचडीएल वाढवतात. याशिवाय गाजर, टोमॅटो, बीट, पालक आणि ब्रोकली या भाज्या हृदयासाठी उपयुक्त आहेत. त्यातील फायबर रक्तातील जादा चरबी शोषून घेऊन गुड कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवते.

Health care
ऑलिव्ह ऑईल आणि हेल्दी फॅट्स
स्वयंपाकात रिफाइंड तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल, राइस ब्रॅन ऑईल किंवा शेंगदाणा तेलाचा वापर करावा. हे तेलांमध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. तूप देखील मर्यादित प्रमाणात घेतल्यास आरोग्यास हितकारक असते.
डाळी, कडधान्ये
हरभरा, मूग, मसूर यांसारख्या डाळी तसेच राजमा, चणे, सोयाबीन ही कडधान्ये शरीरातील एचडीएल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. ओट्स, ब्राउन राईस, ज्वारी, बाजरी आणि गहू यांसारखी संपूर्ण धान्ये खाल्ल्यास फायबरचे प्रमाण वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.(Health care)
जीवनशैलीतील बदल
फक्त आहारच नव्हे तर योग्य जीवनशैली देखील गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी महत्त्वाची असते. नियमित व्यायाम, योग व ध्यान, तणावमुक्त जीवनशैली आणि पुरेशी झोप यामुळे एचडीएलचे प्रमाण वाढते. धूम्रपान व मद्यपान टाळल्यास हृदयाचे आरोग्य अधिक चांगले राहते.
गुड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी ढाल ठरते. त्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी आहारात सुकेमेवे, मासे, ताज्या भाज्या, फळे, हेल्दी तेल आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. सोबतच व्यायाम आणि संतुलित जीवनशैली जपली तर हृदय निरोगी राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. योग्य आहाराच्या सवयींमुळे आपण दीर्घकाळ तंदुरुस्त आणि निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics