Home » प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी या 5 गोष्टींची घ्यावी खास काळजी

प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी या 5 गोष्टींची घ्यावी खास काळजी

महिलांनी प्रेग्नेंसीवेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन पोटातील बाळाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

by Team Gajawaja
0 comment
Pregnancy Care
Share

Health Care During Pregnancy : प्रेग्नेंसीचा कालावधी प्रत्येक महिलेसाठी खास असतो. पण यावेळी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशातच गर्भवती महिलांनी प्रेग्नेंसीच्या काळात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल जाणून घेऊया. जेणेकरुन बाळाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

संतुलित आहार
गर्भवती महिलांनी योग्य प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज व फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय लोह आणि कॅल्शिअमयुक्त पदार्थही खावेत. यामध्ये पालेभाज्या, अंडी, दूध आणि दह्याचे सेवन करावे.

पाणी प्या
गर्भवती महिलांनी प्रेग्नेंसीच्या काळात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. याचा बाळाच्या विकासासाठी फायदा होतो. याशिवाय शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होते. प्रेग्नेंसीच्या काळात द्रव्य पदार्थांचे सेवन करणे टाळू नका.

हेल्थ चेकअप
प्रेग्नेंसीमध्ये वेळोवेळी हेल्थ चेकअप करणे आवश्यक आहे. याशिवाय आरोग्यासंबंधित एखादी समस्या उद्भवल्यास वेळीच डॉक्टरांची भेट घ्यावी.

फिजिकल अॅक्टिव्हिटी
प्रत्येक महिलेसाठी प्रेग्नेंसीचा काळ वेगवेगळा असतो. पण बाळासह स्वत:च्या आरोग्यासाठी प्रेग्नेंसीवेळी फिजिकल अॅक्टिव्हिटी जरुर करा. यावेळी डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.

पुरेशी झोप घ्या
दररोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. गर्भवती महिलांनी पुरेशा प्रमाणात प्रेग्नेंसीवेळी झोप घ्यावी. अन्यथा शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव पडला जाऊ शकतो. (Health Care During Pregnancy)

तणाव मुक्त रहा
प्रेग्नेंसीवेळी स्वत:च्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. यासाठी दररोज योगाभ्यास करू शकता. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.


आणखी वाचा :
पोटफुगीच्या समस्येवर प्या हे 5 ड्रिंक्स
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे का? वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.