Home » देशातील 70 टक्के लोकांना ‘या’ कारणास्तव सतावते पचनासंबंधित समस्या

देशातील 70 टक्के लोकांना ‘या’ कारणास्तव सतावते पचनासंबंधित समस्या

असे म्हटले जाते की, आपली पचनसंस्था ही आरोग्याचे सीक्रेट आहे. वयस्कर व्यक्तींचे हे म्हणणे विज्ञान सुद्धा मान्य करते.

by Team Gajawaja
0 comment
Health Care
Share

असे म्हटले जाते की, आपली पचनसंस्था ही आरोग्याचे सीक्रेट आहे. वयस्कर व्यक्तींचे हे म्हणणे विज्ञान सुद्धा मान्य करते. त्यामुळे हेच कारण होतो की, भारतीय घरांमध्ये जेवणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. मात्र आता बदललेल्या लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आणि स्पर्धात्मक जगात कामाचा ताण वाढल्याने आरोग्यासंबंधित अनेक आजार उद्भवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पोटाचे विकार. (Health care)

तर देशातील 70 टक्के शहरातील लोक पचनासंबंधित समस्यांचा सामना करतात. खरंतर ही आकडेवारी इंडिया डायटेटिक्स असोसिएशनकडून देशातील मोठ्या शहरात करण्यात आलेल्या सर्वेतून समोर आली आहे. भारतात १० पैकी ७ सङरी लोकांना पचन आणि आतड्यासंबंधित समस्या आहे. ऐवढेच नव्हे तर सर्वेत असे ही समोर आले आहे की, यापैकी ५९ टक्के लोक प्रत्येक आठवड्याला ही तक्रार करतात की त्यांचे पोट बिघडले आहे. तर १२ टक्के लोक पोट बिघडल्याच्या समस्येचा प्रत्येक दिवशी सामना करतात. पचनासंबंधित या समस्येच्या कारणास्तव शहरातील लोकांमध्ये ओबेसिटी, हाय बिपी आणि हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढत आहे.

पचनासंबंधित समस्या थेट आपल्या लाइफस्टाइलशी जोडल्या गेल्या आहेत. अनहेल्दी आणि फास्ट फूड पदार्थ सध्या मोठ्या प्रमाणात खाल्ले जाता. यामुळेच कुठे ना कुठे तरी समस्या निर्माण होत आहे. हैराण करणारी गोष्ट अशी की, जंक फूड खाणाऱ्या लोकांनी सुद्धा यामुळे आरोग्य बिघडले जाते हे मान्य केले आहे. मात्र तरीही ते फास्ट फूड खातात. पचनासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी लोक फिजिकल अॅक्टिव्हिटीचा पर्याय निवडतात. ६७ टक्के लोकांनी आपली पचनसंस्था सुधारण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटीचा मार्य निवडला आहे.

शहरी लोकांच्या आरोग्याबद्दल करण्यात आलेल्या सर्वेनुसार असे समोर आले, शहरातील महिलांमध्ये मूड स्विंगची समस्या अधिक आहे. ४१ टक्के महिलांनी स्विकार केले की, त्यांना प्रत्येकवेळी थकलेले वाटते. तर ४० टक्के महिलांनी म्हटले त्यांना दररोज मूड स्विंग सारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ३४ टक्के महिलांनी म्हटले त्यांना एंग्जायटी वाटते. अशातच आयुष्य उत्तम आणि अॅडवान्स बनवण्याच्या धावपळीत लोक आनंदाने आयुष्य जगण्याचा मूळ मंत्रा विसरत चालले आहेत. (Health care)

हेही वाचा- गरजेपेक्षा अधिक टीव्ही पाहणे मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

पाचनक्रिया सुधारण्यासाठी पुढील काही गोष्टी करू शकता
-हाय फायबर डाएटचे सेवन करा
-अधिक फॅट्स असणारे पदार्थ खाणे टाळा
-वेळेवर जेवण करा
-व्हिटॅमिन सी आणि डी चे सेवन करा
-खाल्लेले पदार्थ व्यवस्थितीत चावून खा
-पुरेशा प्रमाणात पाणी प्या


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.