Home » पोटावरील चरबीमुळे मधुमेहाचा धोका? वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स 

पोटावरील चरबीमुळे मधुमेहाचा धोका? वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स 

लठ्ठपणा काही आजारांचे कारण ठरू शकतो. जसे की, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह. पण पोटावरील चरबी अशा लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते जे मधुमेहाच्या आजाराचा सामना करतायत. 

by Team Gajawaja
0 comment
Health Care
Share

Health Care : मधुमेह असा एक आजार आहे जो हेल्दी लाइफस्टाइल आणि औषधांच्या माध्यमातून मॅनेज केला जाऊ शकतो. मधुमेहाचा समूळ नाश करता येत नाही. स्ट्रेस, अयोग्य पदार्थ खाण्याची सवय आणि लठ्ठपण या तीन गोष्टींमुळे मधुमेहाचा धोका वाढला जाऊ शकतो. हेल्थ एक्सपर्ट्स मानतात की, ज्या लोकांचे वजन अधिक असते त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे तुम्ही लाइफस्टाइल संबंधित चुकांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.

हेल्थ एक्सपर्ट्स मानतात की, लठ्ठपणा साखरेसंबंधित आजाराशी जोडलेला आहे. यामुळे बाहेरील पदार्थ जसे की, प्रोसेस्ड आणि जंक फूड पासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका कसा वाढला जातो, जाणून घेऊया सविस्तर….

पोटावरील चरबी आरोग्यासाठी धोकादायक….
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, पोटाच्या आसपास वाढणाऱ्या चरबीमुळे काही आजार मागे लागण्याचा धोका अधिक वाढला जातो. काही वेळेस टाइप2 मधुमेहामुळे वजन किंवा लठ्ठपणा वाढला जाऊ शकतो. खरंतर पोटावरील वाढलेल्या चरबीमुळे शरीरात इंन्सुलिन हार्मोनची प्रक्रिया बिघण्याची शक्यता अधिक वाढली जाते. यामुळे शरीरात सातत्याने साखरेचा स्तर वाढत राहातो. यानंतरच मधुमेहासारख्या  धोकादायक आजाराची शक्यता निर्माण होते.

लठ्ठपणा आणि मधुमेह 
काही प्रकरणी लठ्ठपणा आणि मधुमेहाचा थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे हेल्दी वजनामुळे तुम्ही मधुमेहासारख्या धोकादायक आजारापासून दूर राहू शकता. यासाठी दररोज थोडावेळ व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. व्यायाम केल्याने शरीर लवचीक होण्यासह रक्तातील साखर नियंत्रण राहण्यास मदत होते. याशिवाय तणाव, खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करावा. कोणत्याही प्रकारच्या कार्बोनेटेड सोडा किंवा गोड पदार्थांचे अत्याधिक सेवन करणे टाळले पाहिजे. (Health Care)

मधुमेह झालेल्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये?
काय खाल्ले पाहिजे?
हिरव्या भाज्या- जसे ब्रोकली, गाजर, मिर्ची, टोमॅटो, हिरवे वाटाणे आणि मका. तसच फळ जसे केळ, संत्र, द्राक्ष, सफरचंद, मासे, ओट्स, चिकन, अंडी, लो फॅट दूध, दही, नट्स किंवा शेंगदाणे.

काय खाऊ नये?
अधिक तळलेले पदार्थ, अतिगोड पदार्थ, सोडियम युक्त आहार, शुगर युक्त पेय जसे कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा सोडा.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
रात्री जेवणानंतर गोड खाता का..? होतील या समस्या
थंडीतही हाता-पायांना घाम येतो? करा हे घरगुती उपाय
सर्दी-खोकला झाल्यानंतर या फळांचे सेवन करणे टाळा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.