हेल्दी आरोग्यासाठी झोप फार महत्त्वाची. डॉक्टर सुद्धा आपल्या कमीत कमी ८ तासांची पुरेशी झोप घ्यावी असे सांगतात. मात्र झोप पूर्ण झाली नसेल तर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. मात्र तुम्हाला माहितेय का, शांत झोपेचे खुप फायदे आहेत. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले की, शांत आणि साउंड स्लीप आपल्या मानसिक आरोग्यासंबंधित आजार जसे की, डिप्रेशन, बैचेन राहणे आणि अत्याधिक तणावापासून दूर ठेवते. (Health Care)
बहुतांश लोकांमध्ये सध्या तणावाचे प्रमाण फार वाढले गेले आहे. ताण हा आता सर्वसामान्य ही वाटू लागला आहे.त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली की, त्यावर आपण तो दूर कसा करायचा याचा अधिक विचार करत नाही. त्यामुळे ताण अधिक वाढला जातो.
यॉर्क युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या शोधात वैज्ञानिकांनी याबद्दल असे म्हटले की, दीर्घकाळ असणाऱ्या तणावामुळे आपण मानसिक आजारांचा सामना करतो. त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्याचा विकास होत नाही. यासाठी बैचेन वाटणे आणि नैराश्य हे सुद्धा कारणीभूत आहेत. परंतु जर तुम्ही हेल्दी फूड्स आणि व्यायाम दररोज केला तर मानसिक तणावापासून दूर राहू शकता. यॉर्कच्या अभ्यासानुसार, तणाव कमी करण्यासाठी दोन मुख्य घटक म्हणजे शांत झोप आणि तणावाच्या स्थितीला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे.(Health Care)
अशा प्रकारच्या संबंधांना सखोल दृष्टीकोनातून पाहण्यासाठी संशोधकांनी २०२० मध्ये कोविड-१९ च्या दरम्यान ६०० नागरिकांवर अभ्यास केला. या काळात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संशोधकांनी या सिद्धांताची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामधून समोर आले की, शांत झोप घेतल्यास आपल्यात सकारात्मकता दिसते. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य ही उत्तम राहते.
हेही वाचा- Incomplete Sleep: तुमची झोप रोज अपूर्ण राहते का? मग होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम
एकूण संशोधकांना असे कळले की, दीर्घकाळ तणावाखाली असलो तरीही सकारात्मक दृष्टीकोन आणि शांत झोप ही फार महत्त्वाची आहे. तणावाची स्थिती निर्माण होण्यामागे कारण म्हणजे नैराश्य आणि बैचेन वाटतराहणे. मात्र या अभ्यासातून समोर आले की, शांत झोप ही आपल्या मानसिक आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.
शांत झोप लागण्यासाठी खास टीप्स
-मेडिटेशन करा
जर तुम्हाला शांत झोप लागावी म्हणून तुम्ही दररोज मेडिटेशन करा. यामुळे तणाव कमी होतो आणि मनातून निगेटिव्ह विचार दूर होतात. तसेच जर तुम्हाला इन्सोम्नियाची समस्या असेल तर दररोज १५-२० मिनिटे मेडिटेशन करा.
-डाएटमध्ये मॅग्नेशिअमचा समावेश
मॅग्नेशिमच्या कमतरतेमुळे ताण कमी होतो. हे एक नैसर्गिक रुपात मिळणारे मिनरल आहे, जे स्नायूंना रिलॅक्स करते. यामुळे उत्तम झोप येते. पालक, डार्क चॉकलेट, दही, एवोकाडो याचे सेवन करा. प्रतिदिन कमीत कमी ४०० मिलीग्रॅम पोटॅशिअमचे सेवन करा.
-स्लीप हाइजीनची गरज
जर तुम्हाला शांत झोप लागावी म्हणून तु्म्हाला लाइफस्टाइलमध्ये काही बदल करावेत लागतील. यामध्ये कॅफेन, अल्कोहोल, धुम्रपानचे सेवन कमी करा. तसेच दररोज एक्सरसाइज ही करणे महत्त्वाचे आहे.