Home » Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत

Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत

by Team Gajawaja
0 comment
Health Care
Share

Health Care : भारतीय आयुर्वेद आणि योगशास्त्रात ब्रम्ह मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधीचा हा काळ ब्रम्ह मुहूर्त म्हणून ओळखला जातो. हा वेळ साधारणपणे पहाटे ४ ते ५.३० या वेळेच्या दरम्यान असतो. यावेळी निसर्गात शांतता, शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा भरलेली असते. या वेळेला जागे होणं हे केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर ठरतं.

सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठल्यास मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात. या वेळेस वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे श्वासोच्छ्वास प्रणाली अधिक कार्यक्षमतेने काम करते. नियमित ब्रम्ह मुहूर्तावर उठल्याने मानसिक तणाव कमी होतो, मेंदूला शांती मिळते आणि एकाग्रता वाढते. विद्यार्थी वर्गासाठी तर ही वेळ अभ्यासासाठी सर्वोत्तम मानली जाते. कारण यावेळी मन शांत, स्फूर्तीदायक आणि लक्ष केंद्रीत करणारे असते.

Health Care

Health Care

शरीराच्या दृष्टीने पाहिल्यास, हा वेळ शरीरशुद्धीसाठी अनुकूल असतो. यावेळी पचनक्रिया सुरळीत होत जाते. योग, प्राणायाम किंवा चालणे यासारखी व्यायामपद्धती या वेळेस केल्यास त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे पचनशक्ती सुधारते, हृदयाचे कार्य चांगले राहते आणि शरीरातील साखर व चरबी नियंत्रणात राहते. सकाळच्या थंड हवामानात चालणे किंवा व्यायाम केल्यास शरीर अधिक लवचिक आणि उत्साही राहते.

ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे दिनचर्येतील शिस्त. जे लोक नियमित लवकर उठतात, त्यांची दिनचर्या ठरलेली आणि संतुलित असते. त्यामुळे त्यांना झोपेची कमतरता जाणवत नाही, वजन नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा सवयीचा भाग बनवणं फार आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात ब्रम्ह मुहूर्ताचे पालन केल्यास शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य वृद्धिंगत होतं.(Health Care)

=========

हे देखील वाचा :

Oily Skin Care : पावसाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी?

Skin Care : नाकावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढण्यासाठी घरगुती उपाय

Moonsoon : पावसाळ्यात घरात कुबट वास येतोय? मग करा ‘या’ टिप्स फॉलो

==========

एकंदरीत, ब्रम्ह मुहूर्तावर उठणे ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती विज्ञानाधारित आरोग्यसंपन्न सवय आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात, या सवयीमुळे मनःशांती, ऊर्जा आणि उत्साह लाभतो. म्हणूनच, आपलं आरोग्य टिकवण्यासाठी आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी ब्रम्ह मुहूर्ताचं पालन करावं, हीच खरी जीवनशैलीत सुधारणा करण्याची गुरुकिल्ली आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.