Home » रात्रीच्या वेळी भूक लागत असल्यास ‘या’ गोष्टींनी करा कंट्रोल, वजन ही वाढणार नाही

रात्रीच्या वेळी भूक लागत असल्यास ‘या’ गोष्टींनी करा कंट्रोल, वजन ही वाढणार नाही

by Team Gajawaja
0 comment
Health Care
Share

वजन कमी करण्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याची वेळ ठरवली असेल तर ही उत्तम गोष्ट आहेच. परंतु रात्री उशिरा १०-११ वाजता खाण्याची जी सवय आहे ती सहज सुटत नाही. यावर सुद्धा काही सोप्पे उपाय आहेत. ज्या प्रमाणे तुम्ही खाण्यापिण्याची वेळ ठरवली आहे त्यानुसार तुमची झोपण्याची वेळ ही ठरवा. परंतु काही काही कारणास्तव भूक लागत असेल तर ती भागवण्यासाठी मॅगी, मोमोज, चिप्स, रोल्स, बिस्किट्स सारखे ऑप्शन निवडण्याची चूक करु नका. रात्रीच्या वेळी भूक लागल्यानंतर खाल्ल्यानंतर अधिकतर वजन वाढू शकते. तुम्ही अशावेळी फक्त कॅलरिज नव्हे तर तुम्ही तुमच्या पोटाची चरबी सुद्धा वाढवत आहात हे विसरु नका. यामुळे हळूहळू तुमच्या वजनावर ही परिणाम होऊ शकतो. खरंतर रात्री उशिरा खाणे आरोग्यासाठी उत्तम नसते. कारण ते पचन ही होत नाही. या व्यतिरिक्त तुमची भूक तर भागली जाईल मात्र तुमचे वजन नियंत्रणात राहण्याचे जे प्लॅनिंग आहे त्याची वाट लागेल.त्यामुळे रात्रीच्या वेळी लागणाऱ्या भुकेवेळी तुम्ही अशा काही हेल्थी गोष्टी खाऊ शकता ज्यामुळे तुमचे वजन ही नियंत्रणात राहू शकते.(Health Care)

-पीनट बटरसह ब्राउन ब्रेड (Peanut butter and brown bread)
पीनट बटर मध्ये ट्रिप्टोफॅन असतो जो मसल्सला रिलॅक्स करण्यासग तुमच्या मेंदूला शांत करतो. तसेच तुमची भूक ही भागवतो.

-योगर्ट विद बेरिज (Yogurt with berries)
योगर्ट विद बेरिज हा उत्तम ऑप्शन असून तो आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरु शकतो. या ऑप्शन तुमची भूक भागवेलच पण वजन ही नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.

हे देखील वाचा- लहान मुलांना कोणत्या वयात मसाल्याचे पदार्थ खायला देणे सुरु करावे?

Health Care
Health Care

-बदाम
बदामामध्ये मेलाटोनिन आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. रात्रीच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही बदाम खाल्ल्यास तुम्हाला उत्तम झोप लागू शकते. या व्यतिरिक्त मेंदूच्या चलनासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.

-फळं
फळांचे सेवन करणे हे सुद्धा आऱोग्यासाठी फायदेशीर असते. कारण रात्रीच्या वेळी लागणारी भूक मिटवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फळं ही नेहमीच फायदेशीर मानली जातात. कारण यामध्ये असलेले न्युट्रिशन रात्रीच्या वेळी उत्तम झोप येते. या व्यतिरिक्त तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते.

-सूप
रात्रीच्या वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही सूपचा ऑप्शन निवडू शकता. कारण ते बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. रात्रीच्या वेळी सूप पिणे उत्तम ठरु शकते खासकरुन थंडीच्या वेळी. कारण तेव्हा तुम्हाला आराम मिळू शकतो.

दरम्यान, रात्री झोपताना पुन्हा भूक लागण्यामागील प्रमुख कारण असे की, पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे. एका रिसर्चनुसार, जर व्यक्ती दिवसभरात पूर्णपणे हायड्रेट असेल तर त्याला रात्रीच्या वेळी भूक कमी लागते. या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी भूक लागण्यामागील आणखी एक कारण असे की प्रोटीनयुक्त भरपूर नाश्ता न करणे. लोक प्रोटीन नसलेला नाश्ता करत नाहीत किंवा तसे खाण्याचा कंटाळा करतात. यामुळे शरिरात प्रोटीनची कमतरता भासते आणि त्याच प्रमाणे तुमच्या शरिराचे वेळापत्रक तयार होते. याच कारणामुळे शरिराला विविध वेळी भूक लागते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.