Home » वयाच्या चाळीशीत फिट राहण्यासाठी खास टिप्स

वयाच्या चाळीशीत फिट राहण्यासाठी खास टिप्स

by Team Gajawaja
0 comment
Health care at 40 age
Share

Health Care at 40 Age : वयाची चाळीशी म्हणजे शरीरात आणि मानसिक बदल होण्यास सुरुवात होते. या वयात मेटाबॉलिज्मचा दर (metabolism) हळू हळू कमी होतो, हार्मोनल बदल सुरू होतात, आणि पूर्वीप्रमाणे सहज वजन कमी होत नाही किंवा थोड्याशा निष्काळजीपणानेही थकवा जाणवतो. यामुळेच या वयात फिट राहणं केवळ सौंदर्याचा विषय नसून, दीर्घकालीन आरोग्य आणि उत्साही जीवनशैलीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. यासाठी काही सवयी अंगीकारणं आवश्यक आहेत, ज्या तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने ठेवू शकतात.

सर्वप्रथम, नियमित व्यायाम हा चाळीशीनंतर फिट राहण्याचा आधारस्तंभ आहे. या वयात वजन कमी करण्यापेक्षा स्नायू टिकवणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आठवड्यातून किमान पाच दिवस चालणं, सायकलिंग, योगा, किंवा जलतरणासारखे व्यायाम करा. त्यासोबत दोन ते तीन दिवस strength training म्हणजेच वजनाच्या सहाय्याने होणारे व्यायाम करा. यामुळे हाडं मजबूत राहतात आणि स्नायूंची होणारी झीज टाळू शकतो. याशिवाय, नियमित स्ट्रेचिंग आणि योगासने मानसिक शांतता आणि लवचिकता टिकवण्यास मदत करतात.

Health care at 40 age

Health care at 40 age

आहाराकडे विशेष लक्ष देणंही या वयात अत्यावश्यक ठरतं. शरीराचे पोषण होण्यासाठी समतोल आहार घ्या. प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम यांचा आहारात समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ, अधिक साखर, तेलकट व तळलेले पदार्थ यांचे सेवन टाळा. रोज भरपूर पाणी पिणं आणि वेळेवर जेवणे यासारख्या साध्या सवयीही चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. यासोबत पुरेशी झोप घेणं, तणाव नियंत्रणात ठेवणं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं देखील चाळीशीनंतर तितकंच गरजेचं आहे. तणावामुळे हार्मोनल असंतुलन, वजन वाढ, आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते.(Health Care at 40 Age)

=============

हे ही वाचा : 

Corona : कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गापासून बचावासाठी उपाय

पीरियड्सवेळी महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

==============

आरोग्य तपासणी ही अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. वयाच्या चाळीशीनंतर दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करून घ्या – जसं की ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल आणि बोन डेन्सिटी. कोणत्याही आजाराची सुरुवातीला माहिती मिळाल्यास त्यावर वेळेवर उपाययोजना करता येते. तसेच, या वयात सामाजिक संवाद, छंद जोपासणं आणि नवीन कौशल्य शिकणंही मानसिकदृष्ट्या ताजेपणा देतं. थोडक्यात सांगायचं झालं, तर वयाच्या चाळीशीनंतर फिट राहणं म्हणजे फक्त व्यायाम किंवा डाएट नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल करणं होय.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.