Health Care Advice : भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिटेंड्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आरोग्याला फायदा होतो. खरंतर भोपळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आणि सुरक्षित मानले जाऊ शकते. पण काही आरोग्याच्या स्थितीमध्ये तुम्ही भोपळ्याचे सेवन करणे टाळले पाहिदे. अशात कोणत्या लोकांनी भोपळ्याचे सेवन करू नये याबद्दल जाणून घेऊयात.
-तुम्हाला अतिलठ्ठपणाची समस्या असेल तर भोपळ्याचे सेवन करू नये. कारण यामुळे तुमचे वजन अधिक वाढले जाऊ शकते. याशिवाय पचनासंबंधित समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
-तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्यास तुमचे पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करू नये. यामुळे ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते.
-भोपळ्याची भाजी खाल्ल्याने अॅलर्जीची समस्या वाढू शकते. याशिवाय त्वचेसंबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात. भोपळ्याचे सेवन केल्याने काहींच्या त्वचेवर लाल चट्टे आणि रॅशेजही येऊ शकतात. अशातच तुम्ही तातडीने डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे.
-भोपळ्याचे सेवन कधीच भीतीपोटी करू नये. यामुळे तुमचे ब्लड प्रेशर कमी होऊ शकते. उलटी होऊ शकते. अशातच तुम्ही भोपळ्याची भाजी खाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवा.
भोपळा खाण्याचे फायदे
-वजन कमी होते
वजन वाढल्यास तुम्ही भोपळ्याचे सेवन करू शकता. एका संशोधनानुसार, भोपळ्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. याच्या माध्यमातून अतिरिक्त वसा कमी होऊ शकतो.
-व्हिटॅमिन ए युक्त भरपूर
भोपळ्यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात. त्यापैकीच एक म्हणजे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए शरिरातील हाडे बळकट करण्यासह त्वचेसाठी फायदेशीर असतो. (Health Care Advice )
-रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आजारांपासून लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे महत्त्वाचे आहे. अशातच तुम्ही भोपळ्याचे सेवन करू शकता. एका संशोधनानुसार, भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बीटा- कॅरोटीन, फायबर, रायबोफ्लेविन, पोटॅशिअम आणि कॉपर व मॅग्निज असतात.
-डोळ्यांसाठी फायदेशीर भोपळा
भोपळ्याचे सेवन करणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. भोपळ्यामध्ये असणाऱ्या पोषण तत्त्वांमध्ये बीटा-कॅरोटीनचा समावेश आहे. हे पोषण तत्त्वे अँटी-ऑक्सिडेंट्सप्रमाणे काम करतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखले जाते.
टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.