Home » Weight Loss आणि Fat Loss मधील फरक काय?

Weight Loss आणि Fat Loss मधील फरक काय?

बहुतांशजणांना केवळ वजन कमी करण्यासंदर्भात माहिती असते. पण मसल्स लॉसबद्दल काहींना अद्याप माहिती नसते. अशातच मसल्स आणि फॅट लॉसमध्ये फरक असतो हे तुम्हाला माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
Weight Loss in Winter
Share

Health Care Advice : बहुतांशजणांना केवळ वजन कमी करण्यासंदर्भात माहिती असते. पण मसल्स लॉसबद्दल काहींना अद्याप माहिती नसते. अशातच मसल्स आणि फॅट लॉसमध्ये फरक असतो हे तुम्हाला माहितेय का? ज्यावेळी फिटनेसबद्दल बोलले जाते तेव्हा दोन गोष्टींवर अधिक लक्ष दिले जाते. एक म्हणजे वेट लॉस आणि दुसरे म्हणजे डाएट. मसल्स लॉसबद्दल फार कमी जणांना माहिती असते. अशातच मसल्स आणि फॅट लॉसमध्ये अंतर असते. ज्यावेळी लठ्ठपणाबद्दल बोलले जाते तेव्हा फॅट लॉसचा सल्ला दिला जातो.

फॅट लॉस शरिराला फिट ठेवू शकते. पण मसल्स लॉस आरोग्यासाठी नुकसानदायक ठरते. शरिरातील पॅट कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिटची गरज असते. ज्यावेळी असे होत नाही तेव्हा तुमचे शरिर मसल्स बर्न करत उर्जा देते. अशाप्रकारे हळूहळू मसल्स लॉस होण्यास सुरुवात होते.

मसल्स आणि फॅट लॉसमधील अंतर
फॅट लॉसचा अर्थ असा होतो की, शरिरात जमा झालेले अतिरिक्त फॅट कमी करणे. फॅट मसल्सच्या चारही बाजूना एक स्तर जमा होतो आणि तो कमी झाल्यास शरिराचे वजन कमी होते. पण मसल्स लॉसचा अर्थ असा होतो की, स्नायूंमध्ये घट होणे. मसल्स आपल्या शरिरात ताकद आणि स्थिरता बनवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका साकारते. मसल्स लॉस होणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दरम्यान, वेट लॉसचा अर्थ फॅट लॉससंबधित आहे. पॅट कमी करण्यासाठी कॅलरीजचे प्रमाण कमी करावे लागते. जर तुम्हाला फॅट्स कमी करायचे असल्यास असे होऊ शकते की, तुमच्या मसल्सच्या गरजेनुसार कॅलरीज मिळत नाहीयेत. अशातच बहुतांशजणांच्या मनात शंका असते की, एकाच वेळी फॅट लॉस आणि मसल्स गेन होऊ शकते का? (Health Care Advice)

मसल्स लॉस कसे होते?
वजन कमी करण्यासाठी कॅलरीज डेफिसिटमध्ये जाते म्हणजेच शरिरातील कॅलरीज कमी होतात तेव्हा शरिराला आवश्यक उर्जा मिळत नाही. अशातच शरिर मसल्स बर्न करुन उर्जा प्राप्त करते. यामुळे मसल्स लॉस सुरु होते.


आणखी वाचा :
कमिटमेंट फोबिया म्हणजे काय? कसे रहाल दूर
मानसिक तणाव ‘ या ‘ आजारांचे ठरते कारण, असे राहा दूर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.