Health Care Advice : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या काळात घसा सुकल्याने सातत्याने तहान लागते. यामुळे काही जण पाणी पितात तर काहींना थंडगार कोल्ड ड्रिंक प्यावेसे वाटते. पण उन्हाळ्यात पाण्यापेक्षा काहीजण कोल्ड ड्रिंकचे अधिक सेवन करतात. यामध्येही वेगवेगळे फ्लेवर्स येतात. पण एक लीटर कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी किती पाणी आणि साखर लागते हे माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याबद्दल अनेक रिपोर्ट्स आहेत. त्यामध्ये म्हटलेय की, कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बिझनेस स्टॅण्डर्डच्या रिपोर्ट्सनुसार, एक लीटर कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी चार लीटर पाणी वापरले जाते. खरंतर एका बातमीनुसार आता पाण्याचे प्रमाण कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी कमी करण्यात आले आहे. काही रिपोर्ट्समध्ये म्हटलेय की, एक लीटर कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी जवळजवळ 20 लीटर पाण्याचा खप होतो.
हावर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिपोर्ट्सनुसार, अर्धा लीटर कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. रिपोर्ट्सनुसार, जवळजवळ साडे शंभर ते तीनशे लीटर पाणी खर्च केले जाते. याशिवाय कोल्ड ड्रिंकमध्ये वापरल्या जाणाऱ्या साखरेबद्दल बोलायचे झाल्यास एक लीटर कोल्ड ड्रिंकमध्ये 110 ग्रॅम साखर असते. कोल्ड्र ड्रिंकमध्ये दोन प्रकारची साखर वापरली जाते. एक म्हणजे ग्लूकोज आणि दुसरी म्हणजे फ्रुक्टोज. (Health Care Advice)
कोल्ड ड्रिंकच्या अत्याधिक सेवनाने होईल नुकसान
लोक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात कोल्ड ड्रिंकचे सेवन करतात. पण अत्याधिक प्रमाणात कोल्ड ड्रिंकचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. यामुळे मधुमेहाचा धोका उद्भवचो. याशिवाय हार्ट अटॅक, शरिरात फॅट्स वाढणे अशा समस्याही निर्माण होतात. कोल्ड ड्रिंकमध्ये असणाऱ्या सोड्यामुळे शरिरातील हाडं ढिसूळ होतात.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)