Home » खाण्यापिण्याच्या या गोष्टींमध्ये वापरला जातो आर्टिफिशिअल रंग, आजच दूर रहा

खाण्यापिण्याच्या या गोष्टींमध्ये वापरला जातो आर्टिफिशिअल रंग, आजच दूर रहा

लहान मुलांना आवडणाऱ्या रंगीत चॉकलेट्स जेम्सच्या गोळ्या या पदार्थांमध्ये आर्टिफिशिअल रंगांचा वापर केला जातो. हे रंग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

by Team Gajawaja
0 comment
Health Care Advice
Share

Health Care Advice : सध्या खाण्यापिण्याच्य सवयीत फार मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. खाण्यापिण्याचे रंगीत पदार्थ आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करतात. पण त्याचे सेवन केल्यास आरोग्यावर कधी ना कधी परिणाम होऊ शकतो. अलीकलडल्या काळात रंगीत पदार्थ ट्राय करण्याचा ट्रेण्ड वाढला गेला आहे. यामध्ये काही प्रकारचे आर्टिफिशिअल रंगांचा वापर केला जातो. खरंतर, आर्टिफिशिअल रंग वापरुन तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे ते शरिरात स्लो पॉइजनसारखा परिणाम करतात. यामुळे कोणते गंभीर आजार उद्भवू शकतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

कॅन्सरचा धोका
आर्टिफिशिअल रंगांचा वापर केलेल्या पदार्थांचा वापर केल्याने कॅन्सरचा धोका वाढला जाऊ शकतो. खरंतर, आर्टिफिशिअल फूड कलर तयार करण्यामागे अशा गोष्टींचा वापर केला जातो त्यामध्ये बेंजीन म्हणजेच कार्सिनोजेन आढळते. जे अत्यंत धोकादायक असते. या फूड रंगांमध्ये काही केमिकल्स वापरले जातात. ज्यामुळे काही घातक आजार मागे लागू शकतात. काही रिचर्समध्ये दावा करण्यात आला आहे की, अत्याधिक काळापर्यंत आर्टिफिशिअल रंगांचा वापर केलेले पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढला जाऊ शकतो.

अॅलर्जी वाढली जाऊ शकते
आर्टिफिशिअल फूड रंगांचा वापर केल्याने मुलांमध्ये अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे श्वास फुलण्याची समस्या, पोट दुखी, स्किन रॅशेज, सूज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. मुलांमध्ये यामुळे काही समस्या वाढल्याही जाऊ शकतात.

या फूड्समध्ये वापर केला जातो आर्टिफिशिअल रंगांचा वापर
कडधान्ये
कँडी, चिप्स, च्यूइंग गम
गोड दही
एनर्जी बार
ओटमील, पॉपकॉर्न
व्हेनिला आयस्क्रिम
कोला आणि रेडिमेड ड्रिंक्स (Health Care Advice)

पुढील काही गोष्टींमध्ये आर्टिफिशिअल रंगांचा वापर होत नाही
दूध, दही, पनीर, अंडी
काजू, अक्रोड, सुर्यफूलाच्या बिया
ताजी फळ आणि भाज्या
ब्राउन राइस, क्विनोआ
बीन्स, छोले, डाळ


आणखी वाचा :
एपिलेप्सीच्या रुग्णांना दिलासा
दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी गंभीर आणि दुर्मिळ आजाराचा सामना, हसूच ठरले आजाराचे कारण

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.