आपल्याकडे नेहमीच पांढरे लोणी जेवणात वापरले जाते. पराठे, भाकरी, विविध भाज्या करताना याचा वापर सर्रास केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लोणी प्रचंड आवडते. काही लोकं तर लोणी नुसते देखील खातात, काही त्यात साखर घालून खातात. कृष्णाला आवडणारे हे लोणी जर घरी बनवलेले ताजे लोणी असेल तर विचारूनच नका. केवळ स्वर्गसुखच. मात्र आता अनेक घरांमध्ये आपल्या आरोग्यची आणि तब्येतीची काळजी घेणारे लोकं लोणी खाल्ल्यास वजन वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल लोणी आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही असे सांगत खात नाही. मात्र लोणी आपल्या शरीरासाठी खूपच चांगले आहे. लोणी खाण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला देखील होतात. (White butter Benefits)
अनेक लोकं पांढरे लोणी आणि बाजारात मिळणारे बटर हे सारखेच असल्याचे म्हणतात. मात्र असे नाही. लोणी आणि बटरमध्ये मोठा फरक दिसून येतो. बटर खाल्ल्यावर नक्कीच तुमचे वजन वाढू शकते मात्र लोणी खाल्ल्यावर त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. बटर हे सॉल्टेड असून त्यात अधिक प्रमाणात बीटा कॅरोटीन असते तर लोणी हे अनस्याच्युरेटेड असून त्यात बीटा कॅरोटीन कमी प्रमाणात असते आणि त्यात सोल्युबल फॅट्स असतात. बटर पिवळ्या तर लोणी पांढऱ्या रंगाचे असते. हा रंगातील फरक फॅट्सच्या अधिक प्रमाणावरून ठरतो. (Marathi News)
सॉल्टेड बटर अधिक काळ टिकण्यासाठी त्यात मीठ घातले जाते. मीठ हे नैसर्गिक प्रिसर्व्हेटिव्ह आहे. परंतु, त्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे कॅलरीज वाढतात. शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. तसंच त्यात असलेल्या सॅच्युरेटेड फॅट्समुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका देखील जास्त असतो. १ चमचा लोण्यातून फक्त १०३.५ कॅलरीज तर १ चमचा सॉल्टेड बटरमधून सुमारे २०० कॅलरीज मिळतात. मग पांढरे लोणी खाल्लयने शरीरालाकोणते फायदे होतात? (Latest Marathi News)
वजन कमी करण्यास मदत
लोणी हा lecithin चा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे मेटॅबॉलिझम प्रक्रीयेला आणि कोलेस्ट्रॉल व इतर फॅट्स शरीरात जमा होण्याला मदत होते. त्यामुळे फॅटचे विघटन अधिक चांगल्या पद्धतीने होते. परिणामी वजन कमी होते. त्याचबरोबर बटर खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि कमी कॅलरीज पोटात गेल्याने वजन कमी होण्यास मदत होते. (Top Marathi News)
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
लोण्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, डी यांचे प्रमाण शरीरात राखून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. लोण्यात अँटीफंगल आणि अँटी बॅक्टरील गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. ताप, पोटाचे इन्फेकशन यांसारखे लहान सहान इन्फेकशनवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरते. (Top News)
त्वचा हेल्दी राहते
लोण्यामध्ये व्हिटॅमिन ई, सेलिनियम हे अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्वचेची लवचिकता टिकून राहते व त्वचा हेल्दी राहते.
कॅन्सरमध्ये उपयुक्त
लोण्यामध्ये conjugated linoleic acid (CLA) बरोबरच फॅटी अॅसिड्स असतात. त्यात कॅन्सरशी सामना करण्यास उपयुक्त असे गुणधर्म असतात.
निद्रानाशमध्ये उपयोगी
आयुर्वेदानुसार निद्रानाश, अंथरुणात लघवी करणे तसंच erectile dysfunction यांसारखे सेक्स संबंधित समस्या दूर करण्यासाठी लोणी हा घरगुती उपाय आहे. (Top Marathi News)
गरोदरपणामध्ये लाभदायक
गरोदरपणात लोणी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण वाढत्या बाळाच्या पोषणासाठी आणि प्रसूती वेदना कमी करण्यासाठी लोणी फायदेशीर असते.
==============
हे देखील वाचा : Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’
Shravan : ‘या’ कारणामुळे उद्याचा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ठरणार खास
===============
कमी लॅक्टोज आणि केसिन
पांढऱ्या लोण्यामध्ये कमीत कमी लॅक्टोज आणि केसिन असतात; ज्यामुळे ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. पांढऱ्या लोण्यामध्ये फॅट्स कमी करणारे ए, डी ई व के हे व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात दिसून येतात. यामुळे स्नायू मजबूत ठेवण्यास व डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. (Social News)
(टीप: कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics