Home » भिजवलेले शेंगदाणे खा आणि ‘या’ आजारांना ठेवा दूर

भिजवलेले शेंगदाणे खा आणि ‘या’ आजारांना ठेवा दूर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Soaked Peanuts
Share

आपल्या सर्वच भारतीयांच्या घरात अगदी सहज सापडणारा पदार्थ किंवा वस्तू म्हणजे शेंगदाणे. म्हणजे अगदी पोह्यांपासून ते चटण्यांपर्यंत आणि भाज्यांपासून ते आमट्यांपर्यंत सर्वच पदार्थांमध्ये या शेंगदाण्याचा सर्रास आणि भरभरून वापर होतो. शिवाय शेंगदाणे न आवडणारे लोकं देखील खूपच कमी असतील त्यामुळे जिथे शक्य तिथे आपण जेवणात यांचा वापर करतो. सोबतच एक मधल्या वेळेस तोंडात टाकण्याची वस्तू म्हणून देखील शेंगदाण्याचा वापर होतो.

पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा वापर आपण विविध पद्धतीने करतो. शेंगदाणे आपण खाताना देखील आपण ते कच्चे, भिजवून, भाजलेले, गुळासोबत, चटपटीत करून खातो. सर्वांच्या जिभेला चव देणारे हे शेंगदाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच गुणकारी आहे. आकाराने लहान असलेल्या या शेंगदाण्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आहेत, ज्यामुळे ते अनेकांच्या पसंतीस उतरतात. पण, चवीपलीकडे शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्याने चमत्कारिक फायदे होतात. हे शेंगदाणे खाण्याचे आपल्या शरीरावर अनेक चांगले परिणाम होतात. गरिबांचे काजू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शेंगदाण्याचे त्यातही भिजवलेल्या शेंगदाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊया.

– शेंगदाण्यामध्ये भरपूर फायबर असते. ज्या पदार्थांमध्ये मुबलक फायबर असते ते पदार्थ पचनासाठी चांगले असंतात. शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यात त्याचे सेवन करा याने पचनक्रिया चांगली होईल.

Soaked Peanuts

– भिजवलेले शेंगदाणे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप चांगले असतात. सकाळी उठून हे शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डोळ्यांच्या आरोग्यसाठी, डोळ्यांचा कमकुवतपणा दूर होतो, डोळ्यांवरील ताण दूर होतो म्हणून भिजवलेले शेंगदाणे खावेत. स्मरणशक्ती चांगली व्हावी यासाठी तुम्ही हे भिजवलेले शेंगदाणे खाऊ शकता.

– रोज भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने त्वचेची चमक वाढते. त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. तुम्ही शेंगदाण्यासोबत बदाम आणि मूग डाळ भिजवू शकता. तुमच्या चेहऱ्यावर जर मुरूम असतील तर भिजवलेले शेंगदाणे खा हे अत्यंत फायदेशीर आहेत.

– एका अभ्यासानुसार जे लोक आपल्या आहारामध्ये नियमित स्वरुपात शेंगदाण्याचा समावेश करतात त्यांचे हृदयविकारापासून संरक्षण होते. शेंगदाण्यांमध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह हा एक असा घटक आहे. ज्यामुळे हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका कित्येक पटीनं कमी होण्यास मदत मिळते. आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि कार्यप्रणाली देखील सुरळीत सुरू राहते.

– शेंगदाण्यामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड आहे. या गुणधर्मामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे डॉक्टारांचा सल्ला घेऊन मुलांच्या आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश करावा. जेणेकरून त्यांच्या मेंदूची वाढ योग्य प्रकारे होईल.

– त्वचा चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केले तर तुमच्या त्वचेला फायदा होऊ शकतो. शेंगदाण्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे घटक आहेत. याच कारणामुळे जर तुम्ही सकाळी शेंगदाण्यांचे सेवन केलं तर त्वचेवर नैसर्गिक स्वरुपात तेज येण्यास मदत होईल. तसंच शेंगदाण्यांमध्ये सोरायसिस आणि एक्झिमा यांसारख्या त्वचाविकारांवर उपाय करणारे औषधी गुणधर्म आहेत.

– ज्या लोकांमध्ये ट्रायग्लिसराइडचा स्तर अधिक प्रमाणात असतो, त्यांनी शेंगदाण्यांचे सेवन करावं. यामुळे त्यांच्या ट्रायग्लिसराइडचा स्तर १०.२ टक्के कमी होण्यास मदत मिळते.

========
हे देखील वाचा : हिवाळ्यात हेयर केयरच्या ‘या’ टिप्स वापरून टिकवा केसांची चमक
========

– जेवणानंतर ५० किंवा १०० ग्रॅम शेंगदाण्यांचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ही प्रक्रिया करावी. शिवाय शरीरातील रक्तही वाढते.

– ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी शेंगदाणे खाणे टाळले पाहिजे. यामुळे पित्त वाढण्याची भीती असते.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्याधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.